पुणो मराठाज फायनलमध्ये
By admin | Published: November 25, 2014 12:58 AM2014-11-25T00:58:39+5:302014-11-25T00:58:39+5:30
क्षणाक्षणाला निकालाचे पारडे फिरत असलेल्या चॅम्पियन्स टेनिस लीगमधील उत्कंठापूर्ण लढतीत पुणो मराठाज संघाने हैदराबाद एसेसवर 25-24 अशी अवघ्या एका गेमच्या निसटत्या फरकाने मात केली.
Next
सीटीएल : सुपर टायब्रेकरमध्ये हैदराबादवर
25-24ने निसटती मात, बघदातिस ठरला मॅचविनर
पुणो : क्षणाक्षणाला निकालाचे पारडे फिरत असलेल्या चॅम्पियन्स टेनिस लीगमधील उत्कंठापूर्ण लढतीत पुणो मराठाज संघाने हैदराबाद एसेसवर 25-24 अशी अवघ्या एका गेमच्या निसटत्या फरकाने मात केली. 4 सामन्यांनंतर पुणो संघ 19-18 असा एका गुणाने आघाडीवर असताना हैदराबादच्या मिखाईल युझनीने मार्कोस बघदातिसला 6-5ने पराभूत करीत रोमांच वाढवला. अखेर सामन्याचा निकाल सुपर टायब्रेकरमध्ये लागला. यात बघदातिसने आपला सर्व अनुभव व कौशल्य पणाला लावत विजय खेचून आणला. हा सुपर टायब्रेकर त्याने 5-क् ने जिंकून पुणो मराठाजला अंतिम फेरी गाठून दिली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस स्टेडियममध्ये झालेला हा सामना टेनिसप्रेमींच्या डोळ्याचे पारणो फेडणारा ठरला. पुणो संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी या संघाने बाहेरील मैदानावरदेखील धडाकेबाज
कामगिरी करीत पहिले दोन्ही सामने जिंकले होते.
पुणो संघातील लिजंड खेळाडू माजी विम्बल्डनविजेता पॅट कॅश आजही अपयशी ठरला. हैदराबादच्या मार्क फिलिपोसिसने त्याला 6-3ने सहजपणो पराभूत केले. मिश्र दुहेरीत अॅग्निस्का रद्वांस्का-मार्कोस बघदातिस यांनी मार्टिना हिंगिस-मिखाईल युझनी जोडीवर 6-3 ने विजय मिळवून पुण्याला 9-9 ने बरोबरी गाठून दिली. मात्र, महिलांच्या एकेरीत मार्टिनाने रद्वांस्काला 4-6 ने लोळवून हैदराबादला 15-13 ने आघाडीवर नेले.
पुणो संघ सामना गमावणार असे वाटत असतानाच बघदातिस-साकेत मायनेनी या जोडीने जिगरबाज खेळ करीत संघाचे आव्हान जिवंत ठेवले. पुरुष दुहेरीत या जोडीने युझनी-नेदूंचेङिायान यांना 6-3ने पराभूत करीत 19-18ने पुण्याला आघाडीवर नेले.
(क्रीडा प्रतिनिधी)
दिल्लीविरुद्ध
अंतिम लढत
चॅम्पियन्स टेनिस लीगच्या
पहिल्याच सत्रत अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करणा:या पुणो मराठाज संघासमोर विजेतेपदासाठी दिल्लीचे कडवे आव्हान असेल.