सानिया-हिंगीस ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या फायनलमध्ये
By admin | Published: January 9, 2016 03:20 AM2016-01-09T03:20:59+5:302016-01-09T03:20:59+5:30
भारतीय स्टार सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नव्या वर्षाची सुरेख सुरुवात करताना शुक्रवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
ब्रिस्बेन : भारतीय स्टार सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नव्या वर्षाची सुरेख सुरुवात करताना शुक्रवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
सानिया-हिंगीस या जोडीने आतापर्यंत आपला २५ वा विजय नोंदवताना स्पर्धेच्या महिला दुहेरीत अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित भारतीय-स्वीस जोडीने स्लोव्हाकियाच्या आंद्रेजा क्लेपाक आणि रशियाच्या एला कुद्रावत्सेव्हा जोडीचा ६-३, ७-५ असा सलग सेट्समध्ये पराभव करताना अंतिम फेरी गाठली. भारतीय-स्वीस जोडीची विजेतेपदाची लढत जर्मनची वाईल्ड कार्डप्राप्त जोडी एंजेलिक कर्बर आणि आंद्रिया पेटकोविच व स्पेनची एनाबेल मेडिना गॅरीगुएज व अरांक्शा पारा सांतोजा या जोडीदरम्यान सेमीफायनलच्या लढतीत विजयी जोडीशी होईल. सानिया आणि हिंगीस विद्यमान स्थितीत जगातील नंबर वन जोडी आहे. सानियाने विजयानंतर म्हटले की, ‘आम्ही बऱ्याच कालावधीपासून पराभूत झालो नाही; परंतु नव्या सत्राची सुरुवात करणे कधीही सोपे नसते आणि जेव्हा तुमचे मागचे सत्र इतके चांगले असेल, तेव्हा प्रत्येकाचे लक्ष आमच्यावरच आहे.’