फायनलच्या पराभवाचा वर्ल्डकपवर परिणाम पडणार नाही : मूर्तजा
By admin | Published: March 7, 2016 11:28 PM2016-03-07T23:28:08+5:302016-03-07T23:28:08+5:30
बांगलादेशचा कर्णधार मशर्रफ मूर्तजा याला त्याच्या देशवासीयांना आशिया कप जिंकण्याची भेट देता न आल्याची खंत आहे; परंतु त्याने टी २0 वर्ल्डकपमध्ये त्यांचा संघ सकारात्मक
मीरपूर : बांगलादेशचा कर्णधार मशर्रफ मूर्तजा याला त्याच्या देशवासीयांना आशिया कप जिंकण्याची भेट देता न आल्याची खंत आहे; परंतु त्याने टी २0 वर्ल्डकपमध्ये त्यांचा संघ सकारात्मक विचारासह मैदानात उतरेल असेही म्हटले आहे.
बांगलादेशला दोन दिवसांनंतरच टी-२0 वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्ध खेळायचे आहे. मोर्तजाने भारताविरुद्ध फायनलमधील पराभवानंतर म्हटले, ‘‘आम्ही स्पर्धेतून खूप काही सकारात्मक घेत आहोत. फायनल खेळणे मोठी उपलब्धी आहे; परंतु दोन दिवसांच्या आतच आम्हाला टी-२0 वर्ल्डकप क्वॉलीफाइंग सामना खेळायचा आहे. आधी आम्हाला पात्र ठरायचे आहे आणि त्यानंतर आम्ही ग्रुप आॅफ डेथमध्ये असू. ज्यासाठी आम्हाला मानसिकरीत्या तयार असावे लागणार आहे.’’ त्याने बांगलादेशी पाठीराख्यांना संघाविषयी आणखी संयम राखण्याची विनंती केली.
टी-२0 वर्ल्डकप नवीन स्पर्धा आहे आणि आम्हाला नव्याने पुन्हा सुरुवात करावी लागेल. आमच्याजवळ समतोल आणि सक्षम संघ आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास आहे; परंतु टी-२0 स्वरूपात प्रत्येक सामना जिंकणे शक्य नाही हेही समजून घ्यावे लागेल, असेही त्याने सांगितले.