फेडरर सिनसिनाटी ओपनच्या फायनलमध्ये

By admin | Published: August 18, 2014 02:24 AM2014-08-18T02:24:13+5:302014-08-18T02:24:13+5:30

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने उत्कृष्ट खेळ करताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे़

In the finals of Federer Cincinnati Open | फेडरर सिनसिनाटी ओपनच्या फायनलमध्ये

फेडरर सिनसिनाटी ओपनच्या फायनलमध्ये

Next

सिनसिनाटी : स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने उत्कृष्ट खेळ करताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे़ जेतेपदासाठी त्याची झुंज स्पेनच्या डेव्हिड फेररशी रंगणार आहे़ महिला गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे़ विजेतेपदासाठी तिचा सामना सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविचशी होणार आहे़
१७ ग्रँड स्लॅम आपल्या नावे करणाऱ्या फेडरर याने उपांत्य फेरीच्या सामन्यात आक्रमक खेळ करताना पाचवे मानांकन प्राप्त कॅनडाच्या मिलोस राओनिकवर सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ अशी मात करीत फायनलमध्ये स्थान मिळविले़ फायनलमध्ये फेडररसमोर आता डेव्हिड फेररशी झुंजावे लागणार आहे़ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सहावे मानांकन प्राप्त फेरर याने फ्रान्सच्या जुलिअन बेनातूवर ६-३, ६-२ अशी सरशी साधून अंतिम फेरी गाठली़ महिला गटात अनुभवी सेरेना विल्यम्स हिने उपांत्य फेरीच्या लढतीत १२वे मानांकन प्राप्त डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीला २-६, ६-२, ६-४ अशी धूळ चारून थाटात फायनलमध्ये प्रवेश केला़ अजिंक्यपदासाठीच्या सामन्यात सेरेनाला सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविचचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे़ महिला गटात दुसऱ्या उपांत्य फेरीत इव्हानोविचने रशियन टेनिसपटू आणि फ्रेंच ओपन चॅम्पियन मारिया शारोपोव्हा हिचा ६-२, ५-७, ७-५ अशा गुणफरकाने पराभव केला. (वृत्तसंस्था)

Web Title: In the finals of Federer Cincinnati Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.