टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदकांची शक्यता पडताळा !
By admin | Published: November 3, 2016 04:41 AM2016-11-03T04:41:23+5:302016-11-03T04:41:23+5:30
टोकियोत २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये देशाला अधिकाधिक पदके कशी मिळू शकतील
नवी दिल्ली : टोकियोत २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये देशाला अधिकाधिक पदके कशी मिळू शकतील, यासंदर्भात महिनाअखेरीस उपाययोजना सुचविण्याचे आणि शक्यता पडताळण्याचे निर्देश क्रीडा मंत्रालयाने सर्वच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिले.
मंत्रालयाने एका वृत्तात पदक जिंकू शकतील, अशा खेळाडूंचा शोध, त्यांना लागणारा खर्च आणि साहित्य, स्पोर्टिंग स्टाफ आदींबाबत माहिती ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत मंत्रालयाकडे द्यायची आहे. संभाव्य खेळाडूंना स्थायी स्वरूपात सुविधा मिळाव्यात आणि विश्व दर्जाचा स्टाफ उपलब्ध व्हावा, यासाठी ही पावले उचलण्यात आली. सांघिक स्वरूपात काम करीत चांगल्या निकालासाठी हे आवश्यक असल्याचे मंत्रालयाचे मत आहे. टार्गेट आॅलिम्पिक पोडियमअंतर्गत क्रीडा महासंघ राष्ट्रीय क्रीडा विकास निधीशी संपर्क साधू शकतात. खेळाडू आणि सहयोगी स्टाफच्या कामगिरीची प्रत्येक सहा महिन्यांत समीक्षा केली जाईल. ज्या खेळांच्या महासंघांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाही किंवा जे महासंघ निलंबित आहेत, त्या खेळांसाठी साईद्वारे हे काम केले जाईल. तिरंदाजी, जिम्नॅस्टिक, ज्यूदो आणि टेनिस महासंघांना सरकारने अद्याप मान्यता प्रदान केलेली नाही.(वृत्तसंस्था)