नाणेफेक जिंकून पुण्याची प्रथम गोलंदाजी

By Admin | Published: April 26, 2016 08:03 PM2016-04-26T20:03:34+5:302016-04-26T20:03:34+5:30

हैद्राबाद विरुद्ध पुणे संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग तीन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे संघर्ष करीत

First Bowling by winning toss, Pune | नाणेफेक जिंकून पुण्याची प्रथम गोलंदाजी

नाणेफेक जिंकून पुण्याची प्रथम गोलंदाजी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. २६ - पुणे-हैद्राबाद सामन्यात पावसाने व्यत्येय निर्माण केला आहे. सामन्याची नाणेफेक झाल्यातनंतर एकही चंडू टाकला नव्हता. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना उशीराने सुुरु होणार आहे. सामना सुरु न झाल्यास दोन्ही संघाला १-१ गुण दिला जाईल. सामना स्थानिक वेळेनुसार ८वाजून४५मि. सुरु होईल. हैद्राबाद विरुद्ध पुणे संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग तीन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे संघर्ष करीत असलेल्या पुणे सुपरजायन्ट्सविरुद्धच्या लढतीत पारडे वरचढ मानले जात आहे. दोन्ही संघात एकही बदल करण्यात आला नाही. आधीच्या सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे.

सलग दोन सामने गमाविल्यानंतर सनरायझर्स संघाने मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून, गुजरात लायन्सचा १० गडी राखून आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पाच गडी राखून पराभव करीत शानदार पुनरागमन केले. हैदराबाद संघ आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत गुणतालिकेत सहा गुणांसह चौथ्या स्थानी आहे. याउलट महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील पुणे सुपरजायन्ट्स संघाला पाच सामन्यांत केवळ दोन गुणांची कमाई करता आली असून हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करताना पाच सामन्यांत ८ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सर्वाधिक प्रभावित केले आहे. तो व्हेरिएशनच्या आधारावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकित करीत आहे. त्याच्या खात्यावर सात बळींची नोंद आहे. त्याने प्रतिषटक केवळ ५.७५ च्या सरासरीने धावा बहाल केल्या आहेत. याव्यतिरिक्त बरिंदर सरन, दीपक हुडा आणि विपुल शर्मा यांची गोलंदाजीही उल्लेखनीय ठरली आहे. ते काही लढतींमध्ये महागडे ठरले असले तरी गोलंदाज म्हणून त्यांनी आपली छाप कायम राखली आहे. (वृत्तसंस्था)

>प्रतिस्पर्धी संघ

सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, विपुल शर्मा, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरन, टी. सुमन, आदित्य तारे, केन विल्यम्सन आणि युवराज सिंग.

रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अंजिक्य रहाणे, फाफ डु प्लेसिस, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, जसकरण सिंग, रविचंद्रन आश्विन, अंकित शर्मा, अ‍ॅल्बी मॉर्केल, इरफान पठान, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैंस, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, अशोक डिंडा, दीपक चाहर, स्कॉट बोलँंड, पीटर हैंड्सकोंब आणि अ‍ॅडम जम्पा.

Web Title: First Bowling by winning toss, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.