महिला बॉक्सर्सना मिळाला पहिला विदेशी कोच

By admin | Published: May 25, 2017 01:11 AM2017-05-25T01:11:54+5:302017-05-25T01:11:54+5:30

भारतीय महिला बॉक्सर्सना पहिल्यांदा विदेशी कोच मिळाला आहे. बॉक्सिंग महासंघाने एआयबीएच्या थ्रीस्टार कोच फ्रान्सच्या स्टेफनी कोट्टालोरडा यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.

First foreign coach to get female boxers | महिला बॉक्सर्सना मिळाला पहिला विदेशी कोच

महिला बॉक्सर्सना मिळाला पहिला विदेशी कोच

Next

नवी दिल्ली : भारतीय महिला बॉक्सर्सना पहिल्यांदा विदेशी कोच मिळाला आहे. बॉक्सिंग महासंघाने एआयबीएच्या थ्रीस्टार कोच फ्रान्सच्या स्टेफनी कोट्टालोरडा यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
युरोपियन बॉक्सिंग परिसंघाच्या कोचेस आयोगाच्या सदस्य ४१ वर्षांच्या स्टेफनी जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळाडूंसोबत जुळतील. इटलीची रफेले बर्गामास्को डिसेंबर २०२० पर्यंत युवा महिला संघाची कोच असेल. अलीकडेच नियुक्त झालेले पुरुष संघाचे कोच सँटियागो निवा यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला.
भारतीय बॉक्सिंग संघाचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ‘तिन्ही कोचेसच्या नियुक्तीला काल साईसोबत झालेल्या बैठकीत मूर्त रूप देण्यात आले. भारताच्या कोचिंग स्तरावर स्थिरता आणण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या लाभदायी ठरतील.’ (वृत्तसंस्था)

Web Title: First foreign coach to get female boxers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.