कोल्हापूरच्या स्वरूप उन्हाळकरने इतिहास घडविला; वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी जिंकले 'सुवर्ण'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 04:45 PM2023-07-07T16:45:21+5:302023-07-07T16:45:50+5:30
क्रोएशिया येथे सुरू असलेल्या पॅरी नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वरूप उन्हाळकरने ( Swaroop Unhalkar ) भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.
क्रोएशिया येथे सुरू असलेल्या पॅरी नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वरूप उन्हाळकरने ( Swaroop Unhalkar ) भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्ण आणि स्वरुपचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक ठरले. स्वरूपने R1 पुरुष १० मीटर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात २४५.९ गुणांची कमाई करून सुवर्णपदकावर नाव कोहले. त्याने हंगेरी व स्लोव्हाकियाच्या नेमबाजांवर बाजी मारली. हंगेरीचा रेस्किकने २४५ गुण, तर स्लोव्हाकियाचा मॅलेनोने २२३.७ गुणांची कमाई करून अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक निश्चित केले.
First Gold 🥇for 🇮🇳 at #Osijek2023 WSPS World Cup.
— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) July 7, 2023
Kohlapur-based Swaroop Unhalkar shot 245.9 to take the 🥇in R1 - Men's 10m Air Rifle Standing SH1, ahead of Hungary and Slovakia. #ShootingParaSportpic.twitter.com/Su3wcGt0o9
कोल्हापूरच्या ३६ वर्षीय स्वरूपने टोक्यो पॅरिलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता, परंतु त्याला २०३.९ गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. थोडक्यात त्याचे पदक हुकले. २००९ मध्ये त्याने नेमबाजीला सुरुवात केली आणि २०१२ पासून स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. भारतीय संघ २०२३मध्ये चँग्वॉन येथे झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाला होती आणि ३ रौप्य व ५ कांस्य अशा ८ पदकांची कमाई केली होती. संघाला तेव्हा पदकतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.