स्पर्धेचे पहिले सुवर्ण संजिताला

By admin | Published: February 2, 2015 03:27 AM2015-02-02T03:27:51+5:302015-02-02T03:28:14+5:30

ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मणिपूरच्या खुमुकचाम संजिता चानूने ३५व्या राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत चमकदार

First gold of the tournament, Sanjita | स्पर्धेचे पहिले सुवर्ण संजिताला

स्पर्धेचे पहिले सुवर्ण संजिताला

Next

तिरुवनंतपुरम : ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मणिपूरच्या खुमुकचाम संजिता चानूने ३५व्या राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आज, रविवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्ण पटकाविले. संजिताने महिलांच्या ४८ किलो वजनगटात सुवर्णपदकाचा मान मिळविला. तिची सहकारी मीराबाई साईखोम चानू रौप्यपदकाची, तर आंध्र प्रदेशची उषा कांस्यपदकाची मानकरी ठरली. २१ वर्षीय संजिता चानूने एकूण १८० किलो वजन उचलताना सुवर्णपदक पटकाविले. संजिता चानूने २०व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या कामगिरीत सुधारणा केली. त्यावेळी तिने एकूण १७३ किलो वजन उचलले होते. स्नॅचमध्ये संजिता चानूने ७८ किलो वजन उचलताना राष्ट्रकुल स्पर्धेतील ७७ किलो वजन उचलण्याचा आपला विक्रम मोडला. संजिताने क्लीन अँड जर्कमध्ये १०२ किलो वजन उचलताना एकूण १८० किलो वजन पेलले आणि सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला.

Web Title: First gold of the tournament, Sanjita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.