पहिली कसोटी : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
By admin | Published: February 23, 2017 09:31 AM2017-02-23T09:31:57+5:302017-02-23T09:46:16+5:30
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी ऑस्ट्रेलियान नाणफेके जिंकून प्रथमं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ - एका तपाहून (१२ वर्षे) भारतात विजयाच्या प्रतिक्षेत असलेला ऑस्ट्रेलियाचा संघाने पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत असून पहिला सामना गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रंगत आहे. ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
उभय संघ -
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान साहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव.
ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मॅट रेनशॉ, शॉन मार्श, पीटर हॅण्डसकोम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वॅड, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, स्टिव्ह ओकेफ, नॅथन लिऑन