क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच डिव्हिलिअर्सवर आली ही नामुष्की
By admin | Published: June 8, 2017 10:07 PM2017-06-08T22:07:36+5:302017-06-08T22:11:23+5:30
या सामन्यातील पराभवापेक्षा आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू आणि कर्णधार ए बी डिव्हिलिअर्ससाठी हा सामना ऐतिहासीक ठरला पण वेगळ्या कारणामुळे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 8 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभव पत्करावा लागला. डकवर्थ लुइस नियमानुसार पाकिस्तान संघाला 19 धावांनी विजयी घोषीत करण्यात आलं. या सामन्यातील पराभवापेक्षा आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू आणि कर्णधार ए बी डिव्हिलिअर्ससाठी हा सामना ऐतिहासीक ठरला पण वेगळ्या कारणामुळे.
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज इमाद वसीमने 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डिव्हिलिअर्सला हफिजच्या हातू झेल देण्यास भाग पाडलं. ए बी डिव्हिलिअर्सच्या कारकिर्दीत पहिल्याच चेंडुवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. डिव्हिलिअर्स 12 वर्षांच्या कारकिर्दित 221 सामने खेळला आहे. यातील 212 डावांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. पण यापुर्वी कधीच तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला नव्हता. याचा अर्थ असा नाही की डिव्हिलिअर्स शून्यावर बाद झाला नाही तो 7 वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
यापुर्वी पावसाचा व्यत्यय आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत बुधवारी पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 27 षटकांत 3 बाद 119 धावा केल्या होत्या. त्याच वेळेस पावसामुळे सामना थांबवावा लागला. त्या वेळेस डकवर्थ लुईस नियमानुसार या लक्ष्याचा पाठलाग करणाºया संघाला 100 धावांचे होते आणि पाकिस्तान संघ 19 धावांनी पुढे होता.
पावसामुळे खेळ थांबला तेव्हा शोएब मलिक 16 आणि बाबर आजम 31 धावांवर खेळत होते. फकहर झमन 31 आणि मोहंमद हाफीज 26 धावांवर बाद झाले होते. या दोघांनाही मोर्ने मॉर्कल याने तंबूत पाठवले. त्याआधी पाकिस्तानी गोलंदाजांनी जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असणाºया दक्षिण आफ्रिकेला 8 बाद 219 धावांवर रोखले होते. त्यांच्याकडून डेव्हिड मिलरने एक चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक नाबाद 75 धावा केल्या. ख्रिस मॉरीसने 28 व कागिसो रबादा याने 26 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. सलामीवीर क्विंटन डीकॉकने 33 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अली याने 24 धावांत 3 गडी बाद केले.