कल्याणमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 07:55 PM2018-04-18T19:55:03+5:302018-04-18T19:55:03+5:30

बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २१ आणि २२ एप्रिल रोजी

For the first time in the welfare of international fast ratings chess competition | कल्याणमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

कल्याणमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

googlenewsNext

कल्याण - बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २१ आणि २२ एप्रिल रोजी कल्याण (पूर्व) येथील मेट्रो मॉल येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. जोशीज चेस अकॅडमी आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत विजेत्यांना एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याणमधील युवा बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी परूष व महिला या श्रेणीत पहिल्या दोन क्रमांकाची विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. ५५ वर्षांवरील ज्येष्ठ बुद्धिबळपटूंसाठीही पहिल्या दोन क्रमांकाची पारितोषिके असून दिव्यांग तसेच अंध खेळाडूंसाठीही स्वतंत्र श्रेणी आणि पुरस्कार असणार आहे.

स्पर्धेत विविध विभागांमध्ये एकूण ६५ पारितोषिके देण्यात येणार असून ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटना, अखिल मराठी बुद्धिबळ संघटना आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांची मान्यता या स्पर्धेला आहे. 

Web Title: For the first time in the welfare of international fast ratings chess competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.