Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:08 AM2020-03-16T11:08:28+5:302020-03-16T11:09:46+5:30

पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद Corona Virus मुळे जर्मनीत अडकला आहे. SC Baden OOO या बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो जर्मनीत गेला होता

Five-time World Champion Viswanathan Anand Stuck in Germany Amid Coronavirus Outbreak svg | Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला

Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला

Next

पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद Corona Virus मुळे जर्मनीत अडकला आहे. SC Baden OOO या बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो जर्मनीत गेला होता, परंतु कोरोना विषाणूंमुळे त्याचा तेथील मुक्काम वाढला आहे. सोमवारी तो भारतात येणं अपेक्षित होतं, परंतु या महिना अखेरपर्यंत त्याला भारतात परतता येणार नाही. ५० वर्षीय आनंद फेब्रुवारीत जर्मनीत गेला होता आणि गेला आठवडाभर तो स्वतःहून सर्वांपासून वेगळा आहे. सध्या तो सोशल मीडियावरून कुटुंबीयांशी, मित्रांशी संवाद साधत आहे.

''हा माझ्यासाठी विलक्षण अनुभव आहे. आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवावे लागण्याची वेळ आली आहे,'' अशी प्रतिक्रिया आनंदने Times of Indiaला दिली. तो म्हणाला,''दिवसातून एक फोन घरच्यांना करतो. व्हिडीओ कॉल करून मुलगा अखिल आणि पत्नी अरुणा यांच्याशी संवाद साधतो. आम्ही एकमेकांसोबत सकारात्मक गोष्टींवर चर्चा करत असतो.''

जर्मनीत २७ जानेवारी २०२०मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. आनंद म्हणाला,''इंटरनेटच्या माध्यमातून प्रथमच मला मित्रांशी संवाद साधावा लागत आहे. त्याशिवाय दिवसातून किमान दोनवेळा फेरफटका मारायला जातो. या दरम्यान कोणी ओळखीचं भेटलं, तर त्याच्याशी योग्य ते अंतर राखण्याची मी काळजी घेतो.''

आनंदची पत्नी म्हणाली की,''आनंद तिथे असल्यानं मला भीती वाटत आहे. त्याची आठवण येतेय आणि त्याला काळजी घेण्याचे आम्ही सतत सांगतो. महिना अखेरीस तो भारतात येईल अशी आशा आहे.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं लग्नात केली एक चूक, होऊ शकतो तीन वर्षांचा कारावास

Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?

Web Title: Five-time World Champion Viswanathan Anand Stuck in Germany Amid Coronavirus Outbreak svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.