टेनिसमध्ये फिक्सिंगचे सावट
By admin | Published: January 19, 2016 03:25 AM2016-01-19T03:25:51+5:302016-01-19T03:25:51+5:30
मोसमातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या दिवशी एका वृत्तात टेनिसमध्ये मोठ्या प्रमाणात फिक्सिंग होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मेलबोर्न : मोसमातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या दिवशी एका वृत्तात टेनिसमध्ये मोठ्या प्रमाणात फिक्सिंग होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बीबीसी व बझफीडने दावा केला आहे, की गेल्या दशकात अव्वल ५० मधील १६ खेळाडू सट्टेबाजांच्या टोळीसोबत संपर्कात असून, त्यांचा मॅच फिक्सिंगमध्ये समावेश आहे. त्यात ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन्सचाही समावेश आहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे, की विम्बल्डनमध्ये तीन सामने फिक्स होते. संशयाच्या भोवऱ्यात असलेले ८ खेळाडू आॅस्ट्रेलियन ओपनमध्येही खेळत आहेत. गौप्यस्फोट करणाऱ्या निनावी समूहाद्वारे लीक करण्यात आलेल्या फायलींच्या आधारावर या वृत्तामध्ये म्हटले आहे, की या १६ खेळाडूंवर कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही. असोसिएशन आॅफ टेनिस प्रोेफेशनल्सचे (एटीपी) प्रमुख ख्रिस करमोडे म्हणाले, की वृत्त प्रकाशित होण्याची वेळ योग्य नाही. मॅच फिक्सिंगवर पदडा टाकण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे त्यांनी
स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)