फिक्सिंगचा डाग
By admin | Published: April 8, 2015 03:40 PM2015-04-08T15:40:33+5:302015-04-08T15:40:33+5:30
आयपीएल २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावत सचिन तेंडूलकरला गोड निरोप दिला. पण या पर्वात मुंबई इंडियन्सच्या विजयापेक्षा चर्चा होती ती स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या खेळाडूंची.
Next
>आयपीएल २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावत सचिन तेंडूलकरला गोड निरोप दिला. पण या पर्वात मुंबई इंडियन्सच्या विजयापेक्षा चर्चा होती ती स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या खेळाडूंची. आयपीएल २०१३ मध्ये एस.श्रीशांत, अजित चंडेला व अंकित चव्हाण या तिघांना स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आयपीएलची प्रतिष्ठा धूळीस मिळाली.
खेळाडूंवर कोट्यावधींच्या बोली लागत असतानाच जास्त पैशांच्या हव्यासापोटी खेळाडू फिक्सिंगमध्येही गुंतले. राजस्थान रॉयल्सचे एस.श्रीशांत, अंकित चव्हाण व अजित चंडिला या तिघांना दिल्ली पोलिसांनी मुंबईतील उच्चभ्र हॉटेलमधून अटक केली. आयपीएलमधील दोन सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी बुकिंनाही अटक केली. याशिवाय राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा, चेन्नई सुपर किंग्जचे गुरुनाथ मयप्पन, अभिनेता विंदू दारा सिंग हे तिघे बेटिंग प्रकरणामुळे गोत्यात आले. मयप्पन व विंदूदारा सिंग या दोघांना तुरुंगाची हवा खावी लागली. तर राज कुंद्रा यांची कसून पोलिस चौकशी झाली. चेन्नई सुपर किंग्जची मालकी इंडिया सिमेंट्सकडे असून इंडिया सिमेंट्स प्रमुख एन. श्रीनिवासन आहेत. विशेष म्हणजे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना श्रीनिवासन यांनी आयपीएलचा संघ विकत घेणे वादग्रस्त ठरले. यात भर म्हणजे मयप्पन हे श्रीनिवासन यांचे जावई आहेत. त्यामुळे बेटिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्ज वादाच्या भोव-यात सापडली. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या चौकशी समितीने १३ जणांची चौकशी केली असून कोर्टाकडे अहवाल सादर केला आहे. यामध्ये काही खेळाडूंचाही समावेश असल्याचे समजते. हे प्रकरण सद्या न्यायप्रवीष्ट आहे.