George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:44 PM2020-06-02T15:44:12+5:302020-06-02T15:45:20+5:30
मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे.
मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. पोलीस आणि प्रशासनाविरोधात तेथील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. 25मे पासून अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील पोलिसांविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाला जगभरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. क्रीडा विश्वातही जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध नोंदवला जात आहे. क्रीडा विश्वातून फ्लॉयडच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्याची मागणी जोर धरत आहे. जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च देशातील सर्वात श्रीमंत बॉक्सरनं उचलला आहे.
कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!
25 मे 2020 या दिवशी मिनियापोलीस पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयड याला बनावट नोटा बनवण्या प्रकरणी अटक केली. पण, एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याची मान जवळपास आठ मिनिटे गुडघ्यानं दाबून ठेवली आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेत निदर्शनं केली जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसच्या बंकरमध्ये लपण्याची वेळ आली. जॉर्ज फ्लॉयडच्या निधनानं पुन्हा एकदा कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटली आहे.
क्रिकेटमध्येही वर्णद्वेष; ख्रिस गेलनं सांगितली आपबीती
दिग्गज बॉक्सर फ्लॉयड मेवेदर यानं जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. फ्लॉयडच्या कुटुंबीयांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वीही मेवेदरनं माजी बॉक्सर गेनारो हेर्नांडेझ याच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला होता. हर्नांडेझ याचे 2011 साली वयाच्या 45 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले होते. 1998मध्ये मेवेदरनं हर्नांडेझला पराभूत करून पहिले जागतिक जेतेपद पटकावलं होतं.
Former boxing champion Floyd Mayweather has offered to pay for George Floyd’s funeral and memorial services, and the family has accepted the offer https://t.co/3yxf1Ti0To
— KTLA (@KTLA) June 2, 2020
दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीगमधील चेल्सी क्लबनं जॉर्ज फ्लॉयडच्या निधनाचा तीव्र निषेध करताना. दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
— Chelsea FC (at 🏡) (@ChelseaFC) June 1, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral
"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी
मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!
ब्रिस्बनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव
समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी
पाकिस्तानचे क्रिकेटपटू सरावाला लागले, पण कोरोनाचं गांभीर्य विसरले