‘भविष्यातील संघबांधणीवर भर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:06 AM2017-07-19T00:06:06+5:302017-07-19T00:06:06+5:30
दीर्घकालीन लाभासाठी भविष्यातील २३ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघबांधणी हे आपले लक्ष्य असल्याचे संघाचे कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांचे मत आहे. येथे आजपासून
दोहा : दीर्घकालीन लाभासाठी भविष्यातील २३ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघबांधणी हे आपले लक्ष्य असल्याचे संघाचे कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांचे मत आहे. येथे आजपासून सुरू होत असलेल्या २३ वर्षे गटाच्या एएफसी चॅम्पियनशिप पात्रता फेरीत भारताला सलामीला सिरियाविरुद्ध खेळायचे आहे.
स्पर्धेच्या पूर्वसंध्येला ते म्हणाले, ‘मी भविष्यातील संघबांधणीला महत्त्व देणारा माणूस आहे. मी ज्या खेळाडूंसोबत वेळ घालवित आहे त्यातील अनेक खेळाडू पुढे सिनियर संघासाठी खेळावेत हे माझे ‘टार्गेट’ आहे.’
भारतीय २३ वर्षे गटाच्या संघाने दोन आठवडे नवी दिल्लीत सराव केल्यानंतर सिंगापूरविरुद्ध दोन मैत्री सामने खेळले. त्यानंतर संघ येथे दाखल झाला आहे. वर्षभरापूर्वी सिरियाने एएफसी २३ वर्षे गटाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती पण यंदा त्यांची सुरुवात भक्कम अशी दिसत नाही. सिरियाचे कोच
हुसेन अफाश म्हणाले, ‘आमच्यासाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. पात्रता गाठण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट खेळ करू.’ (वृत्तसंस्था)