फुटबॉल जोड
By admin | Published: July 12, 2014 10:06 PM2014-07-12T22:06:22+5:302014-07-12T22:06:22+5:30
उभय संघांचे गोलकिपर सर्वोत्तम फॉर्मात आहेत. जर्मनीचा मॅन्युअल न्यूएर व अर्जेंटिनाचा सर्जियो रोमेरो यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रोमेरोने उपांत्य फेरीत हॉलंडविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये दोनदा अप्रतिम बचाव करीत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जर्मनीतर्फे लेफ्ट बॅक बेनेडिक्ट हेविडिसची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून सेंटर बॅक मॅट्स हमल्स व जेरोम बोटेंग यांनी छाप सोडली आहे. जर्मनीचे प्रशिक्षक जोओकिम लो यांनी कर्णधार फिलिप लाम याला मिडफिल्डच्या स्थानावरून राईट बॅकमध्ये स्थान देत बचाव मजबूत केला आहे.
Next
उ य संघांचे गोलकिपर सर्वोत्तम फॉर्मात आहेत. जर्मनीचा मॅन्युअल न्यूएर व अर्जेंटिनाचा सर्जियो रोमेरो यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रोमेरोने उपांत्य फेरीत हॉलंडविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये दोनदा अप्रतिम बचाव करीत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जर्मनीतर्फे लेफ्ट बॅक बेनेडिक्ट हेविडिसची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून सेंटर बॅक मॅट्स हमल्स व जेरोम बोटेंग यांनी छाप सोडली आहे. जर्मनीचे प्रशिक्षक जोओकिम लो यांनी कर्णधार फिलिप लाम याला मिडफिल्डच्या स्थानावरून राईट बॅकमध्ये स्थान देत बचाव मजबूत केला आहे. अर्जेंटिनाची बचावफळीही मजबूत आहे. अर्जेंटिनाने अखेरच्या साखळी सामन्यात नायजेरियाचा ३-२ ने पराभव केल्यानंतर गेल्या तीन सामन्यांत एकही गोल स्वीकारलेला नाही. साबेला संघाचा समतोल कायम राखण्यावर भर देत आहेत. रोमेरोचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. राईट बॅक पेब्लो जबालेटा, सेंटर बॅक एजक्विल गेरे आणि मिडफिल्डर झेविअर मश्चेरानो यांनीही या स्पर्धेत छाप सोडली आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या लिओनल मेस्सीची या स्पर्धेतील कामगिरी समाधानकारक ठरली आहे. मेस्सीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे, पण विश्वविजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न अद्याप त्याला सत्यात उतरविता आलेले नाही. मेस्सीने साखळी फेरीत बोस्निया, इराण आणि नायजेरियाविरुद्ध साखळी फेरीतील तीन सामन्यात तीन गोल नोंदविले, पण बाद फेरीत स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि हॉलंडविरुद्ध त्याला गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. पेले, आंद्रेस इनिस्ता, डिएगो मॅराडोना, जिनेदिन जिदान आणि रोनाल्डो यांनी फुटबॉलच्या सर्वोच्च व्यासपीठावर चमकदार कामगिरी करीत आपले श्रेठत्व सिद्ध केलेले आहे. मेस्सीकडे अंतिम फेरीत जर्मनीविरुद्ध इतिहास नोंदविण्याची संधी आहे.