शहरात प्रथमच रंगणार फुटबॉल लीगचा थरार

By admin | Published: November 23, 2014 10:28 PM2014-11-23T22:28:13+5:302014-11-24T00:18:48+5:30

के . एऩ जे. चषक स्पर्धांना आज प्रारंभ

Football league throws in the city for the first time | शहरात प्रथमच रंगणार फुटबॉल लीगचा थरार

शहरात प्रथमच रंगणार फुटबॉल लीगचा थरार

Next

के . एऩ जे. चषक स्पर्धांना आज प्रारंभ
नाशिक : मुंबई, पुणे व औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक शहरात प्रथमच फुटबॉल लीग स्पर्धांचा थरार रंगणार आहे़ डिस्ट्रिक व सिटी सॉकर असोसिएशन आणि जोंधळे पाटील ॲण्ड कंपनीच्या वतीने खुल्या गटातील पुरुषांच्या के . एऩ जे़ चषक फु टबॉल लीग स्पर्धेचे सोमवार, दि़ २४ पासून आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अर्जुन टिळे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दुपारी ४ वाजता माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे़ या स्पर्धेत चार गटांत शहरातील १६ संघांनी सहभाग घेतला आहे़ पहिले सर्व सामने लीग पद्धतीने होणार आहेत़ यामध्ये प्रत्येक सामन्याच्या गुणांच्या जोरावर प्रत्येक गटातील एक संघ उपांत्य स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे़ उपांत्य व अंतिम फेरीचे सामने बाद पद्धतीने होणार आहेत़ २४ ते २८ अशी चार दिवस स्पर्धा रंगणार आहे़ पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष गुलजार कोकणी, राजेंद्र जोंधळे पाटील, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, फुटबॉल प्रशिक्षक बी़ डी़ रॉय आदि उपस्थित होते़
चौकट
असे असतील चार गटांतील संघ
अ गट - एऩ एफ. सी़ सी़ (नाशिक), अर्गस फुटबॉल क्लब (ना़ रोड), इंदिरानगर फुटबॉल क्लब, मॉर्निंंग फुटबॉल ग्रुप (ना़ रोड)़
ब गट - बिटको बॉईज फुटबॉल क्लब (ना़रोड), मॉन्टर्स फुटबॉल क्लब (कॉलेजरोड), एऩसी़एफ़सी़ (कॉलेजरोड), गांधीनगर फुटबॉल क्लब (ना़रोड)़
क गट - टी़ डी़ बॉईज (नाशिक), सिन्नर टायगर्स फुटबॉल क्लब (सिन्नर), अनिकादन फुटबॉल क्लब (ना़रोड), एव्हरग्रीन फुटबॉल क्लब (नाशिक )़
ड गट - नाशिक शहर पोलीस, नाशिक युनायटेड स्पोर्ट्स क्लब (नाशिक), गॅलक्टीकोस फुटबॉल क्लब (सिडको), ईगल्स फुटबॉल क्लब (नाशिक )़

Web Title: Football league throws in the city for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.