VIDEO: खेळाडूंवर चाकू हल्ला, जळते फटाकेही फेकले; LIVE सामन्यात प्रेक्षकांचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:22 PM2023-03-06T13:22:26+5:302023-03-06T13:23:14+5:30

खेळ हा विषय अनेकांच्या जवळचा आहे. पण, कधी-कधी हा खेळ हिंसक वळण घेऊ शकतो.

Football match video, angry fans throw firecrackers and knife on opposition team, horrific scenes during match | VIDEO: खेळाडूंवर चाकू हल्ला, जळते फटाकेही फेकले; LIVE सामन्यात प्रेक्षकांचा धुडगूस

VIDEO: खेळाडूंवर चाकू हल्ला, जळते फटाकेही फेकले; LIVE सामन्यात प्रेक्षकांचा धुडगूस

googlenewsNext

Rampage in Football Match : खेळ हा विषय अनेकांच्या अगदी जवळचा आहे. मग तो क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा अजून कोणता खेळ असो. खेळामधील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागतात. यापूर्वी अनेकदा चालू सामन्यात चाहते हिंसक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे. या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

Bursaspor vs Amedspor या संघातील खेळाडू सामन्यापूर्वी वॉर्मअप करत असताना Amedspor च्या खेळाडूंवर चाकू, जळते फटाके आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. हा हल्ला Bursaspor च्या चाहत्यांनी केला होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर संपूर्ण सामन्यादरम्यान प्रेक्षक कुर्दीशविरोधी गाणीही गात होते.

सामना सुरू होईपर्यंत हल्ले 
सरावाच्या वेळी खेळाडूंवरील चाहत्यांचा रोष सामन्यादरम्यानही कायम होता. हा खेळ 90 मिनिटे चालला आणि यादरम्यान चाहत्यांचा राग खेळाडूंवर दिसत होता. ते त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकताना दिसले. सामन्याची अंतिम शिट्टी वाजल्यानंतरही हा तमाशा सुरुच होता. चाहत्यांनी खेळाडूंवर फेकलेला चाकूही मैदानातून सापडल्याचे चित्र समोर आले. अॅमेडस्पोरच्या टीमने या संपूर्ण घटनेची तक्रार केली. ड्रेसिंग रुममध्ये खाजगी सुरक्षा पर्यवेक्षक, क्लब सुरक्षा अधिकारी, क्लब कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांच्याकडूनही त्यांचा छळ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

तुर्की फुटबॉल महासंघाने मौन बाळगले 
अद्याप या संपूर्ण प्रकरणावर तुर्की फुटबॉल महासंघाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, Amedspor गेल्या काही वर्षांपासून तुर्कीमध्ये वादात सापडले आहे. याचे कारण त्यांचे बदललेले नाव आहे. हे नाव कुर्दिश शहर अमेदवर आधारित आहे.

Web Title: Football match video, angry fans throw firecrackers and knife on opposition team, horrific scenes during match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.