फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ आजपासून, सायंकाळी ७.३० ला उद्घाटन; कतार-इक्वेडोर यांच्यात होणार सलामी लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 08:03 AM2022-11-20T08:03:41+5:302022-11-20T08:04:48+5:30

या सोहळ्याची फुटबॉल चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा रंगारंग उद्घाटन सोहळा दोहा येथील अल बायत स्टेडियमवर होणार आहे.

Football World Cup Grand Opening from today, 7.30 pm; The opening match will be between Qatar and Ecuador | फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ आजपासून, सायंकाळी ७.३० ला उद्घाटन; कतार-इक्वेडोर यांच्यात होणार सलामी लढत

फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ आजपासून, सायंकाळी ७.३० ला उद्घाटन; कतार-इक्वेडोर यांच्यात होणार सलामी लढत

googlenewsNext

दोहा : जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या  फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ आज, रविवारी कतारची राजधानी असलेल्या दोहा शहरात सुरू होत आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या  महाकुंभात गतविजेत्या फ्रान्ससह एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. या संघांची प्रत्येकी चार अशा आठ गटांत विभागणी करण्यात आली असून, यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल. हा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. 

या सोहळ्याची फुटबॉल चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा रंगारंग उद्घाटन सोहळा दोहा येथील अल बायत स्टेडियमवर होणार आहे. यावेळी भारतीय अभिनेत्री नोरा फतेहीदेखील परफॉर्म करणार आहे. या सोहळ्याला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा दोहाच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर असलेल्या अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक संख्या ६० हजार इतकी आहे.   उद्घाटन सोहळा भारतात स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी चॅनेलवर प्रसारित केला जाईल.  

भारताचे उपराष्ट्रपती कतारला भेट देणार - 
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या निमंत्रणावरून धनखड दि. २०-२१ नोव्हेंबर रोजी कतारला भेट देतील. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त उपराष्ट्रपती त्यांच्या दौऱ्यात भारतीय समुदायाला भेटतील.

नोरा-शकिरा दाखवणार अदा -
उद्घाटन सोहळ्यासाठी कलाकारांची संपूर्ण यादी  जाहीर झाली नसली तरी  दक्षिण कोरियन रॉक बँड बीटीएसमधील सात  सदस्यांपैकी एक जंगकूक या समारंभात आपली कला सादर करेल.  कोलंबियन पॉप स्टार शकिरादेखील फिफाच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. म्युझिकल ग्रुप ब्लॅक आईड पीस, रॉबी विल्यम्स आणि भारतीय अभिनेत्री नोरा फतेही हेदेखील कला सादर करतील.

Web Title: Football World Cup Grand Opening from today, 7.30 pm; The opening match will be between Qatar and Ecuador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.