न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रोचे कर्करोगाने निधन
By admin | Published: March 3, 2016 07:01 AM2016-03-03T07:01:42+5:302016-03-03T08:13:03+5:30
न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रो याचे वयाच्या ५३व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. मागील काही दिवसापासून त्याची कर्करोगाशी झुंज सुरु होती.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रो याचे वयाच्या ५३व्या वर्षी कर्करोगाने निधन झाल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे. काही वर्षांपासून दिवसापासून त्याची कर्करोगाशी झुंज सुरु होती पण मैदानात सतत जिंकणाऱ्या हा लढावय्या कर्करोसमार हरला.
मार्टिन क्रो यांना वयाच्या ५० व्या वर्षी ‘लिफोंमा’ या प्रकारचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. क्रो हे न्यूझीलंडच्या सर्वोतम फलंदाजांपैकी एक मानले जातात.
१९९२ साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत मार्टिन क्रो यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. साखळीत दबदबा निर्माण करणा-या न्यूझीलंडला उपांत्यफेरीत पाकिस्तानकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. त्या वर्ल्डकपमध्ये मार्टिन क्रो यांनी सर्वाधिक ४५६ धावा केल्या होत्या.
१९९१ साली कसोटीत श्रीलंकेच्या विरोधात त्यांनी केलेल्या २९९ धावा या न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या सर्वाधिक धावा आहेत. ७७ कसोटी सामन्यात ४६ च्या आव्हरेजने ५४४४ धावा त्यांच्या नावावर आहेत. १९८२ साली त्यांनी पदार्पन केले तर १९९५ साली भारताविरुद्ध खेळलेला त्यांचा शेवटाचा सामना होय. एकदिवसीय सामन्यात ४७०४ धावा त्यांच्या नावावर आहेत.
New Zealand cricket legend Martin Crowe dead at 53, his family says https://t.co/IznWQiOnY4pic.twitter.com/drcoXLq9z1
— AFP news agency (@AFP) March 3, 2016