Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 10:29 IST2020-05-28T10:28:29+5:302020-05-28T10:29:22+5:30
तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न झाले, पण...

Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन
जगभरात कोरोनाचं संकट आलं असताना UFCचा माजी खेळाडू सॅम स्टॉउट याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या एका महिनेच्या मुलीचं निधन झाल्याची घटना घडली आहे. ''काल रात्री माझ्या एक महिन्याच्या मुलीचं सीडनी लव्ह स्टॉउट हीचं झोपेतच निधन झालं,''असे 36 वर्षीय सॅमनं इंस्टाग्रामवर लिहिले.
त्यानं पुढे लिहिले की, आम्ही तिला वाचवण्याचा खुप प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तिच्यासोबतचा एक महिना हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता आणि आता आयुष्यातील सर्वात वाईट काळात जगत आहोत. हे सर्व खोटं आहे, असंच वाटत आहे. जेस्सी ( पत्नी) आणि मी त्या रात्रीपासून एकमेकांचा हात सोडलेला नाही. एकमेकांना आधार देण्याचं काम आम्ही करतोय.''
स्टॉउटनं 2015मध्ये निवृत्ती घेतली. त्यानं UFCमध्ये 20 सामने खेळले. सर्वाधिक UFC सामने खेळणारा तो तिसरा कॅनेडियन खेळाडू आहे. मार्च 2006मध्ये त्यानं पदार्पण केलं होतं आणि स्पेन्सर फिशरला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.