भारतीयांनी तिरंदाजांनी जिंकली चार पदके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:41 AM2018-07-11T04:41:49+5:302018-07-11T04:41:59+5:30

भारताने आशिया चषक विश्व रँकिंग तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात तीन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून मंगळवारी इराणसोबत संयुक्तपणे तिसरे स्थान पटकविले.

 Four medals won by the Indians | भारतीयांनी तिरंदाजांनी जिंकली चार पदके

भारतीयांनी तिरंदाजांनी जिंकली चार पदके

googlenewsNext

तायपेई : भारताने आशिया चषक विश्व रँकिंग तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात तीन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून मंगळवारी इराणसोबत संयुक्तपणे तिसरे स्थान पटकविले. द. कोरिया पहिल्या तसेच यजमान तायपेई संघ दुसºया स्थानी राहिला.
‘मारिया’ या चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता, दोन दिवसांत स्पर्धा गुंडळण्यात आली. अखेरच्या दिवशी पुरुषांच्या रिकर्व्ह कम्पाऊंड वैयक्तिक स्पर्धेत दिव्या छयालने दोन रौप्य पदके जिंकली.
सायंकाळच्या सत्रामध्ये महिला रिकर्व्ह प्रकारात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. यावेळी एकतर्फी झालेल्या लढतीत भारताने जपानचा ६-२ असा पराभव करीत कांस्य जिंकले. दिव्याला कम्पाऊंड प्रकारात स्थानिक खेळाडू तिग तिग वू हिच्याकडून १४४-१४१ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)

Web Title:  Four medals won by the Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा