परेरावर चार वर्षांच्या बंदीची शक्यता

By admin | Published: December 26, 2015 02:48 AM2015-12-26T02:48:59+5:302015-12-26T02:48:59+5:30

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी बंदी असलेल्या औषधाचे सेवन करण्याच्या आरोपाखाली संघातून बाहेर करण्यात आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज कुशल परेराचा ‘बी’ नमुना पॉझिटिव्ह आढळला

Four years of possibility of ban | परेरावर चार वर्षांच्या बंदीची शक्यता

परेरावर चार वर्षांच्या बंदीची शक्यता

Next

कोलंबो : न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी बंदी असलेल्या औषधाचे सेवन करण्याच्या आरोपाखाली संघातून बाहेर करण्यात आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज कुशल परेराचा ‘बी’ नमुना पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यावर चार वर्षांच्या बंदीची शक्यता आहे.
परेराच्या मूत्र नमुन्यामुळे बंदी असलेला पदार्थ आढळून आला. त्यानंतर कतारमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर परेराला श्रीलंका संघाच्या न्यूझीलंड
दौऱ्यातून बाहेर करण्यात आले. श्रीलंका संघाने कसोटी मालिका २-० ने गमावली. डोप चाचणी अपयशी ठरलेला परेरा श्रीलंकेचा दुसरा क्रिकेटपटू आहे.
यापूर्वी २०११ च्या विश्वकप स्पर्धेदरम्यान फलंदाज उपुल थरंगाने बंदी असलेल्या औषधाचे सेवन केल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्यावर तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

श्रीलंका
अपील करणार
श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयशेखरा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ‘आयसीसीने आम्हाला सांगितले की, परेरावर चार वर्षांच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते. परेरावर बंदी घालण्यात आली तर आम्ही त्याविरोधात अपील करणार आहोत. त्याच्यावरील बंदीची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू.’

Web Title: Four years of possibility of ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.