चौथ्या दिवशी भारताची पाच पदके निश्चित, ज्योती, अंकुशिता, शशी, नीतू, साक्षी उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:04 AM2017-11-23T04:04:56+5:302017-11-23T04:05:36+5:30
गुवाहाटी : ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा, नीतू घनघास, साक्षी चौधरी यांनी येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंगच्या चौथ्या दिवशी उपांत्य फेरीत धडक देताच भारताची पाच पदके निश्चित झाली.
गुवाहाटी : ज्योती गुलिया, अंकुशिता बोरो, शशी चोप्रा, नीतू घनघास, साक्षी चौधरी यांनी येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंगच्या चौथ्या दिवशी उपांत्य फेरीत धडक देताच भारताची पाच पदके निश्चित झाली. याशिवाय नेहा यादव आणि अनुपमा यांना स्पर्धा सुरू होण्याआधीच थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाल्यामुळे किमान सात पदके भारताच्या खात्यात येतील, यावर आज शिक्कामोर्तब झाले.
नवीनचंद्र बारडोलाय इनडोअर स्टेडियममध्ये बुधवारी वेल्टर (६९ किलो) गटात आस्था पाहवा हिला चुकांमुळे तुर्कस्थानची ओलतू कन्सेर हिच्याकडून ३-२ असा पराभवाचा धक्का बसला, तर मिडलवेट (७५ किलो) गटात निहारिका गोने तांत्रिकदृष्ट्या तुलनेत वरचढ ठरलेली इंग्लंडची जॉर्जिया ओकोनेरकडून उपांत्यपूर्व लढतीत ५-० ने पराभूत झाली.
६४ किलोच्या उपांत्यपूर्व सामन्यात अंकुशिताने इटलीची नोकोली रेबेका हिच्याकडून बल्गेरियातील सोफिया येथे झालेल्या पराभवाचा वचपा काढताना ३-२ असा विजय साजरा केला.
अंकुशिताच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच भारतीय संघाचे मुख्य कोच राफेल बर्गामास्को यांनी हवेत हात उंचावून आनंद साजरा केला. ५७ किलो गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत भारताच्या शशी चोप्राने कझाकिस्तानची अबिलखान सांदूगाशवर ५-० असा विजय नोंदविला.
ज्योतीने खास शैलीत पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठली. प्रतिस्पर्धी खेळाडूला सारखे चकवून तिन्ही फेºयांमध्ये ज्योतीने ठोशांचा प्रहार करीत वर्चस्व गाजविले. ‘कोचने मला सारखे हलत राहण्याचा सल्ला दिला होता. दुसºया आणि तिसºया फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूने मला पकडण्याचा प्रयत्न करताच मी डावपेच बदलून आक्रमक झाले. त्याचा विजयात लाभ झाला,’ असे ज्योतीने सांगितले.
अंकुशिता उपांत्य फेरीत रेफ्रींमध्ये ३-२ असे मतविभाजन झाल्यावर नाराज होती. पण प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध पराभवाचा वचपा काढल्याचा आंनद तिच्या चेहºयावर दिसला. ‘ही लढत इतकी कठीण होईल, अशी अपेक्षा नव्हती. मी विजयी होईल, असा विश्वास होता,’ असेही ती म्हणाली.
शशीची गाठ कझाकिस्तानची मुरब्बी बॉक्सर अबिलखानविरुद्ध होती. पुढची खेळाडू तांत्रिकदृष्टया भक्कम आणि तंदुरुस्त आहे, हे ध्यानात ठेवून शशीने सावध पाऊल टाकले. नेहमीचे थेट ठोसे अलगद प्रभावी ठरल्याने शशी चोप्राची सरशी झाली.
‘‘मी अबिलखानकडून इस्तंबूलमध्ये पराभूत झाल्याने मला प्रतिस्पर्धी खेळाडूचे डावपेच कळले होते. त्यादृष्टीने दुसºया आणि तिसºया फेरीत कोचच्या टिप्स कृतीत आणल्या. दुसºया फेरीत अधिकाधिक गुणांंची कमाई करीत विजय निश्चित केला होता. तिसºया फेरीत बचावावर भर देत विजय साकार केला,’’ असे विजयानंतर शशीने सांगितले.
>नीतूकडून जर्मनीची मॅक्सी क्लोझर पराभूत
४५ ते ४८ किलो लाईट फ्लाय गटात नीतू घनघास हिने जर्मनीची मॅक्सी क्लोझर हिला ५-० ने धक्का देत उपांत्य फेरी गाठली. साक्षी चौधरीने बँटमवेट गटाच्या उपांत्यपूर्व (५४ किलो) लढतीत चीनची बलाढ्य बॉक्सर झिया लू हिला सलग तीनदा रिंगणात रक्तबंबाळ करताच रेफ्रीने हरियानाच्या साक्षीच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला.जर्मनीच्या मॅक्सी क्लोझरला भारताची नीतू घनघास उजव्या हाताने ठोसा मारताना.