लॉर्ड्सवर पहिल्या सामन्यात शतक झळकविणारा रहाणे चौथा भारतीय

By admin | Published: July 19, 2014 02:05 AM2014-07-19T02:05:27+5:302014-07-19T02:05:27+5:30

अजिंक्य रहाणे लॉडर््सच्या मैदानावर पहिल्या कसोटीत शतक झळकाविणारा चौथा भारतीय ठरला.

The fourth Indian to score a century in the first match at Lord's | लॉर्ड्सवर पहिल्या सामन्यात शतक झळकविणारा रहाणे चौथा भारतीय

लॉर्ड्सवर पहिल्या सामन्यात शतक झळकविणारा रहाणे चौथा भारतीय

Next

लंडन : अजिंक्य रहाणे लॉडर््सच्या मैदानावर पहिल्या कसोटीत शतक झळकाविणारा चौथा भारतीय ठरला. तो सौरभ गांगुली, दिलीप वेंगसकर आणि अजित आगरकर यांच्या क्लबममध्ये जाऊन बसला आहे.
रहाणेने लॉडर््सच्या मैदानावर दुसऱ्या कसोटीत दमदार खेळी करून पहिल्या दिवशी १०३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून इंग्लंडविरुद्ध आपले पहिले शतक झळकाविले. रहाणेने पहिले शतक (११८) न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारीमध्ये वेलिंग्टन येथे ठोकले होते. या मैदानावर पाचव्या क्रमांकावर येऊन शतक करणारा भारताचा पाचवा फलंदाज झाला आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दिन (दोन वेळा), पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर आणि सौरभ गांगुली यांनी शतकी खेळी केली आहे.
लॉर्ड्स कसोटीपूर्वी निराश होतो
लॉडर््सवर कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळताना शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे या जगप्रसिद्ध मैदानावर पहिला सामन्यापूर्वी निराश झाला होता. प्रत्येक शतक विशेष असते. मग ते वेल्गिंटनमध्ये असो किंवा लॉर्ड्समध्ये. हे शतक लॉर्ड्सवर झळकावले असल्यामुळे विशेष आहे. या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी मी निराश होतो.

Web Title: The fourth Indian to score a century in the first match at Lord's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.