फ्रान्स, रशियाचे बॉक्सर्स पुढच्या फेरीत, अनपेक्षित निकालाची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 03:56 AM2017-11-20T03:56:06+5:302017-11-20T03:56:09+5:30

गुवाहाटी : येथील नवीनचंद्र बार्डोलाय इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी सुरू झालेल्या विश्व युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फ्लायवेट गटात फ्रान्स, रशिया आाणि आॅस्ट्रेलियाचे बॉक्सर्स सहज विजयी झाले.

France, Russia Boxers In the next round, there is no unexpected result | फ्रान्स, रशियाचे बॉक्सर्स पुढच्या फेरीत, अनपेक्षित निकालाची नोंद नाही

फ्रान्स, रशियाचे बॉक्सर्स पुढच्या फेरीत, अनपेक्षित निकालाची नोंद नाही

Next

गुवाहाटी : येथील नवीनचंद्र बार्डोलाय इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी सुरू झालेल्या विश्व युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फ्लायवेट गटात फ्रान्स, रशिया आाणि आॅस्ट्रेलियाचे बॉक्सर्स सहज विजयी झाले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी अनेक लढती एकतर्फी झाल्या. उंचीचा लाभ घेणाºया खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर ठोशांचा प्रहार करीत ५-० असा विजय साजरा केला.
युक्रेनची लिसिन्स्का अनास्तासिया हिने जर्मनीच्या हापमन चार्लोटला ४-१ ने नमवून प्रेक्षकांची पसंती मिळविली. थायलंडची नामपई किटिया आाणि इंग्लंडची वाटसन चोएल यांच्यातील लढत मात्र गाजली. अटीतटीच्या संघर्षात पहिल्या दिवशी झालेल्या लढतींचे निकाल नामपईने वाटसनचा ३-२ असा पराभव केला. रविवारी पहिल्या दिवशी भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूंच्या लढती झाल्या नाहीत.
>निकाल : (प्राथमिक फेरी) :
५१ किलो फ्लायवेट : किम चायवोन (कोरिया) वि. वि. थिंग सानू माया (नेपाळ) ५-०, अबद्रायमोवा झानसाया (कझाकिस्तान) वि. वि. वोनयू जोहाना (फ्रान्स) ३-२, हेयबोलेम इंडियाना (आॅस्ट्रेलिया) वि. वि. वेइकेई शायलाह (न्यूझीलंड) ५-०, लिसिन्स्का अनास्तासिया (युक्रेन) वि. वि. हापमन चार्लोट (जर्मनी) ४-१, नामपई किटिया (थायलंड) वि. वि. वाटसन चोएल (इंग्लंड) ३-२, के. डब्ल्यू. इमेनशॉ स्वेंदी (फ्रान्स) वि. वि. साराकोग्लू बायेझ (तुर्कस्थान) ५-०, डेलजर्कनगई खोंगुरुझोल (मंगोलिया) वि. वि. स्टोइव्हा गोरयाना (बल्गेरिया) ५-०, ओल्चानोवा एकेतारिना (रशिया) वि. वि. ब्लाने शाओना (आयर्लंड) ५-०, गाफोरोवा मादिना (तझााकिस्तान) वि. वि. वांग यान (चीन) ४-१.

Web Title: France, Russia Boxers In the next round, there is no unexpected result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.