पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड 211 धावांत गारद

By admin | Published: June 14, 2017 06:46 PM2017-06-14T18:46:57+5:302017-06-14T18:59:52+5:30

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य लढतीत पाकिस्तानी गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले.

In front of Pakistan's precarious position, England won the match by 211 runs | पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड 211 धावांत गारद

पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड 211 धावांत गारद

Next
>ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 14 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य लढतीत पाकिस्तानी गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान इंग्लंडचा डाव अवघ्या 211 धावांत आटोपला. आता विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला केवळ 212 धावांची गरज आहे. 
आज पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथ क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानण्यात येत असलेल्या इंग्लंडचा डाव पाकिस्तानी गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर  गडगडला. सलामीवीर अॅलेक्स हेल्स (13) धावांवर बाद झाला.  त्यानंतर बेअरस्टो (43) आणि जो रूट (46) यांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर 28 व्या षटकात इंग्लंडने 2 बाद 128 अशी मजल मारली होती. पण रूट (46) आणि मॉर्गन (33) धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडला. 
आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने इंग्लंडची धावगती मंदावली. फटकेबाज बेन स्टोक्सलाही पाकिस्तानी माऱ्याचा सामना करताना सावध पवित्रा घ्यावा लागला. मात्र एकीकडून इतर फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतत असताना स्टोक्सने एक बाजू लावून धरत संघाला दोनशेपार मजल मारून दिली. अखेर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात स्टोक्स 34 धावांवर बाद झाला. तो माघारी परतताच इंग्लंडचा डाव संपण्यास वेळ लागला नाही. पाकिस्तानकडून हसन अलीने तीन,  जुनैद खान आणि रुमान रईसने प्रत्येकी दोन आणि शादाब खानने एक गडी बाद केला.  तर इंग्लंडचे दोन फलंदाज धावचीत झाले. 

Web Title: In front of Pakistan's precarious position, England won the match by 211 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.