टोकियोत विझली क्रीडाज्योत, प्रज्वालित ठेवण्यात अपयश; अधिका-यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:32 AM2017-10-17T01:32:36+5:302017-10-17T01:32:46+5:30
१९६४ च्या आॅलिम्पिक आयोजनाची साक्षीदार असलेली क्रीडाज्योत आजपासून चार वर्षांपूर्वीच विझली. ही ज्योत नेहमी प्रज्वालित ठेवण्यात आली होती.
टोकियो : १९६४ च्या आॅलिम्पिक आयोजनाची साक्षीदार असलेली क्रीडाज्योत आजपासून चार वर्षांपूर्वीच विझली. ही ज्योत नेहमी प्रज्वालित ठेवण्यात आली होती. सोमवारी हे वास्तव पुढे येताच जपानच्या अधिकाºयांनी प्रशासकीय गलथानपणामुळे ही चूक झाल्याची कबुली दिली.
जपानच्या द.पश्चिमेकडील कागोशिमा शहरातील क्रीडा संकुलात असलेल्या या ज्योतीला ‘आॅलिम्पिक अक्षय ज्योत’ या नावाने ओळखले जाते. जपानला २०२० च्या आॅलिम्पिकचे यजमानपद मिळताच ही ज्योत पुन्हा चर्चेचा विषय बनली होती. ही ज्योत नोव्हेंबर २०१३ लाच विझल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
क्रीडाज्योत विझण्याच्या दोन महिन्यांआधी जपानला २०२० आॅलिम्पिकचे यजमानपद मिळाले होते. त्या वेळी क्रीडाज्योत घाईघाईत प्रज्वालित करण्यात आली. एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार ‘२१ नोव्हेंबरला मी क्रीडाज्योत विझताना पाहिली. आम्ही ती पुन्हा प्रज्वालित करताच दोन आठवडे जळत होती. मी त्या वेळी काही वक्तव्य केले असते तर अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची भीती होती.’
जपानच्या क्रीडा खात्याने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेत दुसरी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली आहे. ही ज्योत मॅग्निफार्इंग ग्लास तसेच सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने डिसेंबर २०१३ मध्ये प्रज्वलित करण्यात आली आहे.