चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य धोक्यात

By admin | Published: June 24, 2016 01:13 AM2016-06-24T01:13:50+5:302016-06-24T01:13:50+5:30

जगाच्या क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धेत गणना होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे भवितव्य धोक्यात असून, २0२१ मध्ये या स्पर्धेला पूर्णविराम देण्याविषयी विचारविमर्श सुरू आहे.

The future of the Champions Trophy threatens | चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य धोक्यात

चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य धोक्यात

Next

नवी दिल्ली : जगाच्या क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धेत गणना होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे भवितव्य धोक्यात असून, २0२१ मध्ये या स्पर्धेला पूर्णविराम देण्याविषयी विचारविमर्श सुरू आहे.
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ही अखेरची स्पर्धा असू शकते आणि त्या जागेवर एक नवीन एकदिवसीय लीग सुरू होण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २0१३ नंतर संपवण्याची योजना सुरू होती; परंतु ही स्पर्धा आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरल्याने तो निर्णय मागे घेण्यात आला होता.
आतापर्यंतच्या ७ सत्रांनंतरदेखील चॅम्पियन्स ट्रॉफी विशेष काही करण्यात अपयशी ठरली आहे आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत असतानाचे चित्र आहे. याशिवाय अन्य एक प्रमुख कारण म्हणजे दोन वर्षांच्या अंतराने टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकपचे आयोजन होते. त्याचा परिणामही चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाहावयास मिळतो. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकप यशस्वीपणे भरून काढते. पुढील वर्षी १ ते १८ जूनदरम्यान होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. २0२१ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा निरस होण्याच्या स्थितीत भारताला २0२२ आणि २0२४ च्या टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्याचा हक्क मिळू शकतो.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी होणाऱ्या आयसीसीच्या समीक्षेत वैश्विक स्पर्धेबरोबरच कसोटी आणि वनडे क्रिकेटची संख्या कमी करण्याचादेखील प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. त्यात खेळाडूंना द्विपक्षीय सीरिज, देशांतर्गत लीगसाठी जास्त वेळ उपलब्ध होऊ शकेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी आयसीसीच्या विद्यमान समीक्षेची शिकार बनू शकते. त्या स्थानी २0१९ मध्ये वनडे लीग आयोजित करण्याची योजना आहे. त्यात १३ देशांचा समावेश केला जाऊ शकतो. तथापि, वर्ल्डकपबरोबरच ५0 षटकांच्या आणखी एका स्पर्धेमुळे वेळापत्रक आणखी व्यस्त होईल आणि चाहते गोंधळात पडतील.

Web Title: The future of the Champions Trophy threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.