छ. शिवाजी महाराजांमुळेच मी मजबूत आहे
By Admin | Published: July 26, 2016 09:04 PM2016-07-26T21:04:11+5:302016-07-26T21:28:21+5:30
२०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मला नोकरीत बढती देण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली. मात्र तेव्हापासून काहीच पावले उचलली गेली नाहीत
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ : २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मला नोकरीत बढती देण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली. मात्र तेव्हापासून काहीच पावले उचलली गेली नाहीत. मला कोणी प्रायोजकही नसल्याने अनेकांनी मला बॉक्सिंग सोडण्याबाबत सल्ले दिले. मात्र मी त्यांचे ऐकले नाही. माझी नाळ ही मराठ्यांशी जोडली गेली आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी खूप प्रेरीत असल्यानेच मानसिकरीत्या मजबूत आणि जिद्दि आहे, असे वक्तव्य रिओ आॅलिम्पिकमध्ये ६४ किलोवजनी गटात भारताचे प्रतिनिधित्त्व करणारआ बॉक्सर मनोज कुमारने केले.
आॅलिम्पिकसाठी भारतीय संघातील सदस्य असलेला मनोज तब्बल सहा वर्षांपासून नोकरीतील बढतीच्या प्रतिक्षेत आहे. २०१० साली राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये तृतीय श्रेणीचा कर्मचारी असलेल्या मनोजला बढती देण्याबाबत आश्वासने देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी यांनी मनोजला आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे यानंतर सात मंत्र्यांनी हे पद सांभाळले, पण मनोजला मिळालेले आश्वासन पुर्ण झाले नाही.
नोकरीतील बढतीबाबत मी मुकुल राय यांच्यापासून विद्यमान मंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत सर्वांना पत्र लिहिले. प्रत्येकाने मला याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले, मात्र, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. शिवाय प्रायोजक मिळवण्यासाठी मी अनेक मोठमोठ्या कंपन्यांना पत्र लिहून कळवले. परंतु, त्यांना वाटले असेल की मी इतका पुढे जाऊ शकणार नाही. शिवाय माझ्याकडे माझ्याविषयी बोलणारे कोणीही नसल्याने ही गोष्टही माझ्याविरुध्दच गेली,ह्णह्ण अशी खंतही मनोजने यावेळी मांडली.
यानंतरही बॉक्सिंग का सोडली नाही, यावर मनोज म्हणाला, ह्यह्यएक सेकंदपण मी असा विचार केला नाही. लोकांना चुकीचे ठरवण्यामध्ये खूप आनंद मिळतो. मी कोणाच्याही समर्थनाशिवाय आज यश मिळवले आहे. माझ्याकडे केवळ कोच आणि मोठा भाऊ राजेशची साथ आहे.