गब्बरची अर्धशतकी खेळी

By admin | Published: July 21, 2016 11:45 PM2016-07-21T23:45:56+5:302016-07-21T23:45:56+5:30

वेस्ट इंडिजविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 50 षटकात 2 बाद 158 धावा अशी सुरुवात केली.

Gabbar's 50th Test | गब्बरची अर्धशतकी खेळी

गब्बरची अर्धशतकी खेळी

Next

ऑनलाइन लोकमत
अ‍ॅण्टीग्वा, दि. 21-  कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव यामुळे सतत टीकेचा धनी ठरत असलेला सलामीवीर शिखर धवन याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 50 षटकात 2 बाद 158 धावा अशी सुरुवात केली. आपल्या तुफानी खेळीमुळे गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या धवनने आक्रमणाला मुरड घालत अर्धशतक झळकावून विंडिजला दबावाखाली ठेवले.
येथील सर विवियन रिचडर््स स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुरली विजय आणि शिखर धवन यांनी सावध भूमिका घेताना विंडिज गोलंदाजीचा आणि खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. शॅनॉन गॅब्रीयल, कर्णधार जेसन होल्डर आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी अचूक मारा करताना भारतीयांना जखडवण्यात यश मिळवले.
गॅब्रीयल टाकत असलेल्या सातव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मुरली विजय ब्रेथवेटच्या हाती झेल देऊन परतला. विजय २६ चेंडूत एका चौकारासह केवळ ७ धावा काढून परतला. यानंतर धवनच्या सोबतीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने दमदार बचाव करताना विंडिज गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही. विश्रांतीपर्यंत या दोन्ही फलंदाजांनी विंडिजला आणखी यश मिळवण्यापासून रोखले.
मात्र, विश्रांतीनंतर लगेच फिरकीपटू देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर अनावश्यक फटका मारुन पुजाराने आपली विकेट अक्षरश: बहाल केली. पुजाराने ६७ चेंडूंचा सामना करताना १६ धावा काढल्या. यावेळी विंडिज वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. परंतु, कर्णधार विराट कोहलीने जम बसलेल्या धवनला योग्य साथ दिली. या दोघांनी संयम व आक्रमणाचा योग्य ताळमेळ साधत भारताचा धावफलक हलता ठेवला. धवन १२१ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ७३ धावांवर खेळत आहे. तर कोहलीने ५७ चेंडूत २ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद आहे.
.........................................

संक्षिप्त धावफलक :
भारत (पहिला डाव) : ४५ षटकात २ बाद १३६ धावा (शिखर धवन खेळत आहे ७३, विराट कोहली खेळत आहे ३४, चेतेश्वर पुजारा १६, मुरली विजय ७; शॅनॉन गॅब्रीयल १/२९, देवेंद्र बिशू १/३४)

Web Title: Gabbar's 50th Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.