शहीदांना श्रद्धांजली वाहताना धोनीवर 'गंभीर' निशाणा
By admin | Published: September 19, 2016 04:49 PM2016-09-19T16:49:58+5:302016-09-19T16:49:58+5:30
भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्विटरद्वारे उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.मात्र,श्रद्दांजली वाहतानाही धोनीवर त्याने टीका केली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.19- भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्विटरद्वारे उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, श्रद्दांजली वाहतानाही भारतीय संघाचा टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर त्याने टीका केली आहे. एखाद्या क्रिकेटपटूवर चित्रपट बनवण्याची आवश्यकता नाही असं ट्वीट गंभीरने केलं. गंभीर आणि धोनी यांच्यातील ताणलेले संबंध क्रिकेट जगताला ज्ञात आहेतच. गंभीरचं हे ट्वीट दोघांच्या ताणलेल्या संबंधांवर आणखी प्रकाश टाकतं.
'एखाद्या क्रिकेटपटूवर चित्रपट बनवण्याची आवश्यकता नाही त्यापेक्षा ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे किंवा देशाच्या कल्याणासाठी ज्यांनी काही केलं आहे अशा व्यक्तींवर चित्रपट बनवण्याची गरज आहे. शहीद झालेल्या 17 जवानांवर चित्रपट बनवणं जास्त योग्य आहे', असं ट्वीट गंभीरने केलं.
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 18, 2016
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावरील 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे गंभीरच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
These 17 martyrs deserv a biopic rather dan any cricketer. No better inspiration dan a young man sacrificing his life 4 his country.
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 19, 2016
'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा धोनीच्या भूमिकेत दिसणार आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.