गंभीरच्या केकेआरला विराट चॅलेंज

By admin | Published: April 23, 2017 07:53 PM2017-04-23T19:53:00+5:302017-04-23T19:53:00+5:30

मागच्या सामन्यात गुजरात लायन्सने केकेआरच्या गोलंदाजीची काढलेली पिसे कर्णधार गौतम गंभीर विसरला नसेल. त्यासोबत रॉयल

Gambhir's KKR Virat Challenge | गंभीरच्या केकेआरला विराट चॅलेंज

गंभीरच्या केकेआरला विराट चॅलेंज

Next

 आकाश नेवे/ऑनलाइन लोकमत
मागच्या सामन्यात गुजरात लायन्सने केकेआरच्या गोलंदाजीची काढलेली पिसे कर्णधार गौतम गंभीर विसरला नसेल. त्यासोबत रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची गेल्या सामन्यातील स्फोटक खेळीदेखील अप्रतिम होती. त्याचेच आव्हान केकेआर समोर आहे. बंगलुरूचा संघ सातव्या स्थानावर असला तरी दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरसमोर त्यांचे मोठे आव्हान आहे. आज ईडन गार्डनवर ८ वाजता हा सामना होणार आहे. बंगलुरूचा संघ हा त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठीच नावाजलेला आहे. सलामीवीर ख्रिस गेल, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स, ट्रॅव्हिस हेड, केदार जाधव अशी दमदार आणि कोणत्याही क्षणाला सामना पालटण्याची ताकद असलेल्या फलंदाजांची फौजच आरसीबीकडे आहे. गुजरात लायन्स विरोधातील सामन्यात त्याचा प्रत्यय आला. या सामन्यात गेलेला त्याचा हरवलेला सूर सापडला. त्यासोबतच दुखापतीतून पुनरागमन केलेल्या कोहलीनेही आपला दम दाखवून दिला. डिव्हिलियर्सच्या या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे, तर केदार जाधव हा छोटे पॅकेट मे बडा धमाका  म्हणून ओळखला. आपल्या तंत्रशुद्ध फटक्यांनी तो सामन्याचा मोहराच बदलून टाकतो. फलंदाजी दमदार असली, तरी आरसीबीसमोर गोलंदाजीचे मोठे आव्हान आहे. चहल सातत्याने चांगली कामगिरी करत असला, तरी त्याला इतर गोलंदाजांची
फारशी साथ मिळालेली नाही. मागच्या सामन्यात पवन नेगीने सुरुवात केली आणि यशही मिळवले. मात्र, तो बेभरवशाचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो.शेन वॉटसन सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे कर्णधार विराटनेदेखील  त्याच्यावर उघड टीका केली आहे. स्टुअर्ट बिन्नी, अ‍ॅडम मिल्ने आणि श्रीनाथ अरविंद हेदेखील अपयशी ठरले आहेत.
ईडन्सवर होणाऱ्या सामन्यांसाठी केकेआरच सगळ््यांची पसंती आहे. केकेआरने आपल्या अनोख्या रणनीतीने सगळ््यांनाच चकित केले आहे. सुनील नारायणला
सलामीला पाठवण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला आहे. तो पुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र रॉबिन उथप्पाला पुन्हा यष्टीरक्षणाची जबाबदारी देणे, केकेआरला परवडणारे नाही. मागच्या सामन्यात त्याने रैनाचा सोपा झेल सोडला होता, या जीवदानाचा फायदा घेत रैनाने मॅचविनिंग खेळी केली होती. शाकिब अल हसनने १०च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्याऐवजी ट्रेंट
बोल्ट किंवा अन्य गोलंदाजाचा विचार करावा लागेल. गोलंदाजी अपयशी ठरली असली, तरी प्रशिक्षक जॅक कॅलिस यांनी आपल्या गोलंदाजांचा बचाव केला आहे. आयपीएलमध्ये या आधी केकेआर आणि आरसीबी यांच्यात १८ सामने झाले आहेत. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ९ सामने जिंकले आहेत, तर चॅम्पियन्स लीग टी-२० झालेल्या सामन्यात केकेआरने विजय मिळवला आहे.

Web Title: Gambhir's KKR Virat Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.