गंभीरकडून विराटची "पोलखोल", सांगितलं का देतो इतक्या शिव्या
By admin | Published: April 26, 2017 08:56 AM2017-04-26T08:56:05+5:302017-04-26T08:56:05+5:30
एका मुलाखतीत गंभीरने तो आणि विराट कोहली मैदानावर इतके आक्रमक का असतात आणि इतक्या शिव्या का देतात याचा खुलासा केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26- कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली या दोघांमध्ये बरंच साम्य आहे. नेतृत्वगुण आणि मैदानावर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी दोघे ओळखले जातात. दोघे मैदानावरही खूप आक्रमक असतात, याव्यतिरिक्त आणखी एक साम्य म्हणजे दोघे दिल्लीचे आहेत.
जतीन सप्रूसोबत नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गंभीरने तो आणि विराट कोहली मैदानावर इतके आक्रमक का असतात आणि इतक्या शिव्या का देतात याचा खुलासा केला आहे. दिल्लीचे खेळाडू मैदानावर इतक्या शिव्या का देतात ? असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला होता. त्यावर, मला आणि विराटला बघून तुम्हाला असंच वाटेल असं सांगताना मैदानावर आक्रमक राहण्यासाठी शिव्या देतो असं गंभीर म्हणाला.
गंभीरने पुढे बोलताना सांगितलं की, "ही गोष्ट ते कोणाकडून शिकत नाहीत, पण दिल्लीचं कल्चरच असं आहे. हे "गुण" दिल्लीच्या खेळाडूंमध्ये आपोआप येतात, तुम्ही याला दिल्लीची संस्कृती म्हणू शकता, पण या आक्रमकतेचा फायदा मैदानावर आणि खेळासाठी होतो", असं तो म्हणाला.
पण हे सर्व करताना भावनांना आवर घालण्याची गरज असल्याचंही तो म्हणाला. "अशाप्रकारच्या घटनांमध्ये लाईन क्रॉस होणार नाही याची काळजी घ्यायला लागते, कारण लाखो लोकं तुम्हाला पाहत आहेत याचं भान ठेवावं लागतं. एखाद्या वेळेस मी भांडण करून घरी जातो तेव्हा घरच्यांचा सामना करायला लाज वाटते", असंही गंभीरने मान्य केलं. "तुम्ही अनेकांचे रोल मॉडेल असता त्यामुळे भावनांना आवर घालणं गरजेचं असल्याचं", गंभीर बोलला आहे.