जड बॅटमुळे खेळाचे तंत्र बदलले

By admin | Published: December 16, 2015 03:33 AM2015-12-16T03:33:06+5:302015-12-16T03:33:06+5:30

भारतामध्ये शालेय स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्यांची कमतरता नाही. पण त्यांच्यात संयमाची कमतरता जाणवते. अलीकडे जगभरातील फलंदाज जड बॅट वापरतात. त्यामुळे फलंदाजीतील

The game tactics changed with heavy bat | जड बॅटमुळे खेळाचे तंत्र बदलले

जड बॅटमुळे खेळाचे तंत्र बदलले

Next

- शिवाजी गोरे ल्ल पुणे

भारतामध्ये शालेय स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्यांची कमतरता नाही. पण त्यांच्यात संयमाची कमतरता जाणवते. अलीकडे जगभरातील फलंदाज जड बॅट वापरतात. त्यामुळे फलंदाजीतील तंत्रच बदलले आहे, असे निरीक्षण सिडनी विद्यापीठाचे क्रिकेट मार्गदर्शक डॉ. रेने फर्डिनान्स यांनी ‘लोकमत’कडे नोंदवले.
रेने काही दिवसांसाठी पुण्यात क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर शालेय मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. ते म्हणाले, ‘‘भारतात मी आतापर्यंत मुंबई, दिल्ली, बंगळुरू या शहरांमध्ये गेलो आहे. तेथे मी जेव्हा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले, तेव्हा लक्षात आले, की खेळाडूंमध्ये गुणवत्ता खूप आहे. पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. पालकांना हे लक्षात येत नाही, की आपण आपल्या पाल्याला कोणत्या मार्गदर्शकाकडे पाठवावे. दुसरे, पालकांना त्यांच्या मुलाकडून लगेच रिझल्ट हवा असतो. आज तो खेळायला गेला, की काही महिन्यांत त्याने जिल्हा किंवा राज्याच्या संघाकडून खेळावे असे त्यांना वाटते. आज मैदानावर खेळायला गेल्यावर काही महिन्यांत आपण अव्वल क्रिकेटपटू झालो, असे युवा खेळाडूंना वाटते. यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो.’’
सध्याच्या क्रिकेटमध्ये स्किल, टेक्निक आणि स्टॅमिना आवश्यक...
सिडनी येथे क्रिकेटमध्ये बायोमेकॅनिक शास्त्रात पीएच. डी. केलेले रेने म्हणाले, ‘‘क्रिकेटमध्ये आता यशस्वी होण्यासाठी खेळाडूकडे स्किल, टेक्निक आणि स्टॅमिना हवा. त्यांच्याकडे संयमसुद्धा तेवढाच पाहिजे. खेळपट्टीवर असताना गोलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू टाकणार आहे, हे त्याच्या गोलंदाजी शैलीवरून ओळखण्याची कुवत फलंदाजाकडे असली पाहिजे; अन्यथा पूर्वी आपल्याविरुद्ध गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची व्हिडिओ क्लिप त्याने पाहिलेली असणे आवश्यक आहे. पण, शालेयस्तरावर हे कोण पाहते? लहान वयातच क्रिकेटपटूंना हे सर्व मार्गदर्शकांनी सांगणे गरजेचे आहे. त्यांनी मुलाची कुवत पाहून त्याच्या अंगकाठीनुसार व्यायाम करवून घ्यायला हवा. जेणेकरून तो क्रिकेट वा अन्य खेळाचा सराव आनंदाने आणि आत्मीयतेने करेल. शालेय स्तरावर आवश्यक त्या बाबींचे ज्ञान मिळाल्यास खेळाडू वरिष्ठ गटात गेल्यावर ताण जाणवणार नाही.’’

मार्गदर्शकाने स्वत: अपडेट असणे महत्त्वाचे
शालेय स्तरावर मार्गदर्शक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याच्या मार्गदर्शनाने क्रिकेटपटू घडत असतो. सरांचे माझ्याकडे लक्ष नाही, असे खेळाडूला कधीच वाटायला नको. मार्गदर्शकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण पुढील पिढी तयार करीत आहोत, हे मार्गदर्शकाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्याने क्रिकेटपटूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले पाहिजे. यासाठी मार्गदर्शकाने स्वत: अपडेट असणे, ही स्पर्धेच्या युगात काळाची गरज बनली असल्याचे फर्डिनान्स यांनी स्पष्ट केले.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज ही जगातील एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. तिचे फलंदाजीचे तंत्र वाखाणण्याजोगे आहे. तिच्या फलंदाजीत काही तांत्रिक त्रुटी मला जाणवल्या. त्या सुधारण्यासाठी मी मार्गदर्शन केले. काही चुका या सराव करताना दुरूस्त होतील, तर काहींसाठी थोडा वेळ जावा लागेल. फलंदाजीतील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने नियमित सराव आवश्यक आहे. मितालीने या त्रुटी दूर केल्यास तिची फलंदाजी आणखी बहरेल. भारतीय संघातील निरंजना नागराजन हीसुद्धा चांगली वेगवान गोलंदाज आहे.
- डॉ. रेने फर्डिनान्स

Web Title: The game tactics changed with heavy bat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.