रिओमध्ये क्रीडाग्राम अद्याप सज्ज नाही!
By admin | Published: July 27, 2016 03:50 AM2016-07-27T03:50:02+5:302016-07-27T03:50:02+5:30
आॅलिम्पिकचे यजमान शहर असलेल्या ब्राझीलच्या रिओमध्ये क्रीडाग्राम अद्यापही सज्ज झालेले नाही. अनेक कामे रखडल्याने दहा दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प
रिओ : आॅलिम्पिकचे यजमान शहर असलेल्या ब्राझीलच्या रिओमध्ये क्रीडाग्राम अद्यापही सज्ज झालेले नाही. अनेक कामे रखडल्याने दहा दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. ५ आॅगस्ट रोजी आॅलिम्पिकचे उद्घाटन होईल, पण त्याआधी जगातील खेळाडूंचे निवासस्थान असलेले क्रीडाग्राम सुसज्ज होईल का, याबाबत संभ्रम कायम आहे.
आॅस्ट्रेलियाच्या आॅलिम्पिक पथक प्रमुखांनी तर क्रीडाग्राम सज्ज नसेल, तर आम्ही आपल्या खेळाडूंना हॉटेलमध्ये ठेवण्यास पसंती देऊ, असे वक्तव्य केले आहे. दुसरीकडे आयोजकांनी रखडलेल्या कामांना गती देण्याचे वचन दिल्याने निर्धारित कालावधीत काम पूर्ण होईल, अशी आशा बाळगून आॅस्ट्रेलियाचे खेळाडू बुधवारपर्यंत येथे पोहोचतील, अशी शक्ता वर्तविण्यात आली आहे.
५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत आयोजित या क्रीडा महाकुंभाला दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. अशातच क्रीडाग्राममधील अर्धवट कामांमुळे आयोजकांच्या चिंतेत भर पडली. आॅलिम्पिक क्रीडाग्राममध्ये ठिकठिकाणी लोखंडी तारा परसल्या असून, भिंतीतून पाणी झिरपत असल्याची तक्रार आॅस्ट्रेलियाच्या निरीक्षण पथकाने रविवारी आयोजकांकडे केली होती. आमचे खेळाडू येथे थांबणे शक्य नाही, अशीही त्यांनी धमकी दिली होती.
आॅस्ट्रेलियाच्या आॅलिम्पिक पथकाच्या प्रमुख किटी चिलर म्हणाल्या, की आयोजन समितीने कामाची गती वाढविली. यावर आम्ही समाधानी आहोत. माझ्या मते बुधवारपर्यंत आमचे खेळाडू येथे दाखल होऊ शकतात. आम्ही आयोजकांकडे २०० समस्यांचा पाढा वाचला आहे. सफाईसाठी आम्ही स्वत:चे पैसे खर्च केले. आयोजक समिती हे पैसे परत करणार हेदेखील कोडे आहे.(वृत्तसंस्था)
- अर्जेंटिना आॅलिम्पिक समितीचे प्रमुख गेरार्डो वेरथिन म्हणाले, की क्रीडाग्राममधील काही मजल्यांचे बांधकाम
पूर्ण झाली नसल्याची
तक्रार आहे.
आम्ही आॅलिम्पिक क्रीडाग्रामबाहेर आपल्या खेळाडूंची निवासव्यवस्था केली आहे. माझ्या
खेळाडूंना देण्यात
आलेल्या पाच मजली ब्लॉक्समधील कामे अद्यापही रखडलेली आहेत.