गांधीची जेतेपदाकडे वाटचाल
By admin | Published: November 1, 2014 12:22 AM2014-11-01T00:22:24+5:302014-11-01T00:22:24+5:30
विभागीय खो-खो स्पध्रेत शुक्रवारी झालेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीच्या पुरुष व महिला संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Next
मुंबई : अमर हिंद मंडळाने मुंबई खो-खो संघटना व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित विभागीय खो-खो स्पध्रेत शुक्रवारी झालेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीच्या पुरुष व महिला संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गांधी स्पोर्ट्स अकादमीच्या पुरुषांनी विद्यार्थी संघाला व महिलांनी o्री समर्थला पराभूत केले.
दुसरीकडे पुरुषांमध्ये प्रबोधन संघाने ओम समर्थला व महिलांमध्ये बदलापूरच्या शिवभक्तने सरस्वतीला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात प्रबोधन क्रीडा भवनने ओम समर्थ भा. व्या. मंदिरचा 16- 9 ( 9-7 व 7-5) असा 7 गुणांनी धुव्वा उडवला.
पुरुष विभागात एकेकाळी भारतात सर्वोच्च स्थानावर असलेल्या o्री समर्थ व ओम समर्थला या स्पध्रेत सपाटून मार खावा लागलेला आहे. कोणीही सदैव सर्वोच्च राहू शकत नाही हा दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांसाठी इशाराच आहे.
प्रबोधनच्या सागर घाग (2 : 1क्, 2 : 4क् मि. संरक्षण), अक्षय मिरगळ (1 : 4क्, 2 : 2क् मि. संरक्षण व 2 गडी) व प्रमोद तेली (2 : क्क्, 1 : 5क् मि. संरक्षण व 1 गडी) यांनी त्यांच्या विजयात चमकदार कामगिरी केली तर ओम समर्थच्या विलास करंडे (2 : 1क्, 2 : 5क् मि . संरक्षण), अंकित निंबरे (1 : 5क्, 2 : 2क् मि. संरक्षण व 1 गडी) यांची एकाकी लढत पराभव वाचवू शकली नाही.
महिलांच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महात्मा गांधीने o्री समर्थवर 9-8 (4-5 व 5-3) असा साडे तीन मिनिटे राखून 1 गुणाने विजय संपादन केला. मध्यांतराला o्री समर्थने 1 गुणाची आघाडी घेऊन विजयासाठी कमालीच्या आशा पल्लवीत केल्या होत्या मात्र मध्यांतरानंतर o्री समर्थची कामगिरी ढेपाळली.
महात्मा गांधीच्या कविता गोलांबडे (2 : 3क्, 4 : 3क् मि. संरक्षण व 2 बळी), मोक्षदा हातनकर (1 : 5क्, 2 मि. संरक्षण) तर o्री समर्थच्या साजल पाटील (2 : 1क्, 2 : 2क् मि. संरक्षण व 4 बळी) व अनुष्का प्रभु (2 : 4क् नाबाद, 1 : 1क् मि. संरक्षण) यांचा खेळ उत्कृष्ट झाला.
च्पुरुषांच्या उपउपांत्य फेरीच्या दुस:या महात्मा गांधी संघाने क्रीडा केंद्राचा 12 - 1क् (1क् - 5 व 2 - 5) असा आठ मिनिटे राखून 2 गुणांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात महात्मा गांधीच्या दीपेश मोरेने ( 4 : 3क्, मि. संरक्षण ) पहिल्या डावात व हर्षद हातनकर
( 4 : 3क्, मि. संरक्षण व 1 गडी ) एकहाती सामना फिरवताना विद्यार्थीच्या तोंडाला फेस आणला. त्यांच्याच अभिजित जाधवने 5 गडी बाद केले.