गांगुली प्रकरणात हितसंबंधाचा मुद्दा नाही : मनोहर
By admin | Published: December 8, 2015 11:53 PM2015-12-08T23:53:06+5:302015-12-08T23:53:06+5:30
भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीबाबत हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होत नाही, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीबाबत हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होत नाही, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी व्यक्त केले.
उद्योगपती संजीव गोयंका यांची कंपनी न्यू राइझिंगने पुणे संघ विकत घेतल्यानंतर हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित झाला. कारण गांगुली संचालन परिषदेचा सदस्य आहे त्याचप्रमाणे इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहभागी झालेला फुटबॉल संघ एटलेटिको डी कोलकाताचा सहमालक आहे. संजीव गोयंकाचा एटीकेच्या मालकांमध्ये समावेश आहे. गांगुलीबाबत हितसंबंधाबाबतचा मुद्दा उपस्थित होत नाही. जर गांगुली आयपीएलच्या कुठल्या संघासोबत जुळलेला असता तर गोष्ट वेगळी असती. हितसंबंध गुंतल्याचा अर्थ बऱ्याच जणांना ठाऊक नाही. समजा मी एक वकील आहे आणि माझा एक क्लायंट आहे. क्लायंटचा जर भविष्यात कुठल्या प्रकारे बीसीसीआयसोबत संबंध आला तर हितसंबंधाचा मुद्दा कसा काय उपस्थित होईल. पदावर असताना भेदभाव करीत असेल तर हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होतो. हितसंबंध गुंतल्याच्या मुद्याचा आता विपर्यास करण्यात येत आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. आता बीसीसीआने एक स्वतंत्र लोकपालची (सेवानिवृत्त न्यायमूर्ती एपी शाह) नियुक्ती केलेली असून हितसंबंध गुंतल्याची शक्यता आहे का, याबाबत ते निर्णय घेतील. पोलिसांसोबत समन्वय साधण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रमुख अजय शिर्के यांना त्यांची उपस्थिती हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी पुरेशी आहे का, असे विचारण्यात आले. याबाबत बोलताना शिर्के म्हणाले, ‘‘माझ्या मते नाही. हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा कुठे
उपस्थित होतो. (वृत्तसंस्था)
‘भारत-पाक मालिकेचे भविष्य करायला मी ज्योतिषी नाही’
भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका कधीपर्यंत होईल, या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी फार सावधपणे दिले. भारत सरकारने मालिकेत खेळण्याबाबतची अंतिम
मंजुरी प्रदान केली नसल्याने मालिकेचे भविष्य सध्यातरी अधांतरी आहे.
मालिकेचे आयोजन नेमके कधी होऊ शकते, असा प्रश्न मनोहर यांना विचारताच ते म्हणाले, ‘‘ही मालिका पाकने आयोजित करायची असल्याने आयोजन स्थळ, तिकीट व्यवस्था आणि प्रायोजकांबाबत निर्णय त्यांंनी घ्यायचा आहे. दौऱ्याबाबत सरकारची मंजुरी मिळेल, अशी शक्यता वाटते काय, असा प्रश्न करताच ते म्हणाले, ‘‘मी काही ज्योतिषी नाही.
भारत-पाक मालिकेबाबत निश्चित भविष्य वर्तविणे माझे काम नाही. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विदेश प्रकरणाच्या सल्लागारांसमवेत चर्चेसाठी आजच इस्लामाबाद येथे रवाना झाल्या आहेत.’’