डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

By Admin | Published: August 27, 2015 03:57 AM2015-08-27T03:57:20+5:302015-08-27T03:57:20+5:30

दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याने भारताचा माजी

Ganguly's record was broken by De Villiers | डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

googlenewsNext

डरबन : दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला.
डिव्हिलियर्सने सर्वात कमी १८२ डावात या धावा केल्या आहेत. गांगुलीने २०० डावांत ८ हजार धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडुलकरने २१०, ब्रायन लाराने २११ व महेंद्रसिंग धोनीने २१४ डावांत ८ हजार धावा पूर्ण केल्या. डिव्हिलियर्सने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १९ धावा करताच हा विक्रम आपल्या नावे केला. त्यानंतर ६४ धावांवर तो बाद झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Ganguly's record was broken by De Villiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.