राज्य खो-खो संघटनेच्या विश्वस्तपदी गणपत पोळ

By admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:34+5:302016-09-22T01:16:34+5:30

जळगाव : राज्य खो-खो संघटनेच्या विश्वस्तपदावर जळगाव जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव गणपत पोळ यांची निवड करण्यात आली आहे.

Ganpat Pol, a trustee of State Kho-Kho Association | राज्य खो-खो संघटनेच्या विश्वस्तपदी गणपत पोळ

राज्य खो-खो संघटनेच्या विश्वस्तपदी गणपत पोळ

Next
गाव : राज्य खो-खो संघटनेच्या विश्वस्तपदावर जळगाव जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव गणपत पोळ यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत राज्य संघटनेचे सचिव प्रा.चंद्रजीत जाधव यांनी गणपत पोळ यांचे नाव विश्वस्त पदासाठी सुचवले. त्याला अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. पोळ यांनी या आधी राज्य संघटनेचे संयुक्त चिटणीस म्हणून काम केले आहे. तसेच अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार अर्ज छाननी समिती सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
या नियुक्तीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नितीन पाटील, नामदेव सोनवणे, चंदू महाजन, जयांशु पोळ, राहूल चौधरी, राहूल पोळ, दत्ता महाजन उपस्थित होते.

Web Title: Ganpat Pol, a trustee of State Kho-Kho Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.