गौडा, टिंटूकडे भारतीय पथकाचे नेतृत्व
By Admin | Published: August 18, 2015 10:39 PM2015-08-18T22:39:05+5:302015-08-18T22:39:32+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेता विकास गौडा आणि दिग्गज धावपटू टिंटू लुका हे आयएएफ विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेता विकास गौडा आणि दिग्गज धावपटू टिंटू लुका हे आयएएफ विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व करतील. बीजिंगमध्ये २२ ते ३० आॅगस्टदरम्यान आयोजित या स्पर्धेसाठी नऊ प्रकारांसाठी १७ खेळाडूंची घोषणा भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने मंगळवारी केली.
भारतीय संघात दहा महिला आणि सात पुरुषांचा समावेश असून, वैयक्तिक व रिले प्रकारात भारतीय खेळाडू भाग घेतील. भारतीय
खेळाडू दहा स्पर्धा प्रकारांत पात्र ठरले होते पण राजिंदरसिंग याला थायलंडमधील आशियाई ग्रॅन्डमास्टर स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याने
तो विश्व स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
गौडा सध्या अमेरिकेत सराव करीत आहे. तो थेट स्पर्धास्थळी दाखल होईल. गोळाफेकपटू इंदरजित, तसेच टिंटू लुका हे दोघे दिल्लीहून रवाना होणार आहेत. मध्यम पल्ल्याची धावपटू ओपी जैशा, सुधा
सिंग, ललिता बाबर, हे कोईम्बतूर येथून रवाना होणार
आहेत. पुरुष व महिला पायी चालण्याच्या शर्यतीतील भारतीय खेळाडू अनुक्रमे दिल्ली व बेंगळुरू येथूून स्पर्धेकडे रवाना होणार आहेत. (वृत्तसंस्था)