गौतम गंभीरकडून नरेनची स्तुती

By admin | Published: May 11, 2015 02:39 AM2015-05-11T02:39:14+5:302015-05-11T02:39:14+5:30

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने त्याचा संघसहकारी कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेनची प्रशंसा केली.

Gaurav Gambhir praises Naren | गौतम गंभीरकडून नरेनची स्तुती

गौतम गंभीरकडून नरेनची स्तुती

Next

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने त्याचा संघसहकारी कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेनची प्रशंसा केली. कोलकाता व पंजाब संघांदरम्यान शनिवारी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या रंगतदार लढतीत कोलकाता संघाने केवळ एक गडी राखून विजय मिळवला असला, तरी त्या सामन्यात नरेनने अचूक मारा करताना पंजाब संघाच्या चार फलंदाजांना माघारी परतवले होते. गंभीर म्हणाला, ‘नरेन शानदार गोलंदाज असल्याचा उल्लेख वारंवार केला असून, तो आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.’ नरेनच्या गोलंदाजी शैलीबाबत बोलताना गंभीर म्हणाला, ‘लोकांच्या मनात जसे येते तसे ते बोलतात. त्याच्या गोलंदाजीचे रहस्य आता उलगडले आहे, असे मी कुठेतरी वाचले होते. तो काही रहस्यमय गोलंदाज नाही. माझ्यासाठी तो कुठल्याही परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे. नरेनने शानदार पुनरागमन केले. मानसिकदृष्ट्या कणखर असलेला तो गोलंदाज आहे. पुनरागमनानंतर चमकदार कामगिरी करणे प्रशंसेस पात्र आहे.’

Web Title: Gaurav Gambhir praises Naren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.