फिरकी विकेटवर खेळण्याची तयारी ठेवावी : गावसकर

By admin | Published: March 17, 2016 03:50 AM2016-03-17T03:50:45+5:302016-03-17T03:50:45+5:30

टी-२० विश्वचषकाच्या सलामी लढतीत न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच ‘फिरकीच्या शस्त्राने’ घायाळ केले. यजमान या नात्याने भारतीय संघ पाहुण्यांसाठी ‘टर्निंग विकेट’ तयार करणार असेल

Gavaskar should be ready to play on spin: Gavaskar | फिरकी विकेटवर खेळण्याची तयारी ठेवावी : गावसकर

फिरकी विकेटवर खेळण्याची तयारी ठेवावी : गावसकर

Next

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाच्या सलामी लढतीत न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच ‘फिरकीच्या शस्त्राने’ घायाळ केले. यजमान या नात्याने भारतीय संघ पाहुण्यांसाठी ‘टर्निंग विकेट’ तयार करणार असेल, तर भारतानेही फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर सज्ज राहायला हवे, असे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
न्यूझीलंडने भारताला ४७ धावांनी पराभूत केले. पाहुण्या फिरकी गोलंदाजांनी दहांपैकी नऊ गडी बाद केले. गावसकर म्हणाले, की तुम्ही जर दुसऱ्यांसाठी फिरकी विकेट बनवीत आहात, तर स्वत: फिरकी माऱ्यास खेळणे शिकायला हवे. भारतीय फलंदाजांना चांगला फिरकी मारा खेळणे कठीण गेले, अशी कबुली द्यायला हवी. भारतीय संघ जिंकला असता, तर फिरकी मारा वगैरे गोष्टी आल्या नसत्या.
भारत-द. आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना अडीच दिवसांत आटोपल्यानंतर आयसीसीने नागपूरच्या खेळपट्टीला नोव्हेंबरमध्ये अधिकृत ताकीद दिली होती. न्यूझीलंडविरुद्ध काय निकाल लागला, हे ध्यानात न ठेवता पाकला प्रत्येक आघाडीवर पराभूत करण्यासाठीच खेळावे लागेल. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. पाकविरुद्धचा सामना त्याहून कठीण असेल. अतिआत्मविश्वास भारताला नडला. दुसरीकडे ताळमेळ साधण्यासाठी न्यूझीलंडचे कौतुक करावे लागेल. भारत अतिआत्मविश्वासामुळे हरला. तीन फिरकीपटू घेऊन खेळणाऱ्या न्यूझीलंडला विजयाचे श्रेय द्यावे लागेल. (वृत्तसंस्था)

पहिलाच सामना गमविल्यानंतर भारताने स्वत:ची वाटचाल कठीण केली. पुढचा सामना पाकविरुद्ध आहे. भारताचा दुसरा पराभव झालाच, तर स्पर्धेबाहेर होण्यासारखेच राहील.
- सुनील गावसकर

Web Title: Gavaskar should be ready to play on spin: Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.