अथलेटिक्स स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला जनरल चॅम्पियनशिप!

By संदीप आडनाईक | Published: March 16, 2023 11:53 PM2023-03-16T23:53:48+5:302023-03-16T23:54:09+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे अजिंक्यपद पहिल्यांदाच मिळाले आहे.

General Championship to Shivaji University in Athletics Competition! | अथलेटिक्स स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला जनरल चॅम्पियनशिप!

अथलेटिक्स स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला जनरल चॅम्पियनशिप!

googlenewsNext

संदीप आडनाईक, कोल्हापूर: चेन्नई येथील चेन्नई फिजिकल  एज्युकेशनल अँड स्पोर्ट्स येथे सुरू असलेल्या ८२ व्या अखिल भारतीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये  शिवाजी विद्यापीठाने जनरल चॅम्पियनशिप मिळवली. शिवाजी विद्यापीठाच्या आज पर्यंतच्या इतिहासामध्ये हे अजिंक्यपद पहिल्यांदाच मिळाले आहे. एकूण ९१ गुण मिळवून हे यश सर्व ॲथलेटिक्स खेळाडूंनी खेचून आणले आहे.

ओव्हर ऑल ९१ गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाचा संघ अजिंक्य ठरला. सुदेषणा हणमंत शिवणकर हिने शंभर मीटरमध्ये प्रथम आणि दोनशे मीटरमध्ये द्वितीय, अनुष्का कुंभार हिने ४०० मीटर हर्डल्स मध्ये द्वितीय, रोहिणी पाटील ८०० मीटर मध्ये तृतीय, प्राजक्ता शिंदे हिने ५००० मीटर मध्ये तृतीय आणि दहा हजार मीटर मध्ये द्वितीय, रेश्मा  केवटे हिने २१ किलोमीटर मध्ये प्रथम आणि पंधरा हजार मीटरमध्ये तृतीय, उत्तम पाटील याने ५००० मीटर मध्ये तृतीय, सुशांत जेधे याने ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये तृतीय,  विवेक मोरे याने दहा हजार मीटरमध्ये द्वितीय आणि २१ किलोमिटर मध्ये द्वीतीय,कुशल मोहिते याने डकेथलोन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

Web Title: General Championship to Shivaji University in Athletics Competition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.