जर्मनीचा दिग्गज फुटबॉलर थॉमस मुलरची निवृत्ती; EURO 2024 पराभवानंतर घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 06:57 PM2024-07-15T18:57:49+5:302024-07-15T19:15:11+5:30

Germany Thomas Muller retirement: २०१४च्या फुटबॉल विश्वविजेत्या संघात त्याचा समावेश होता

Germany star footballer Thomas Muller announces international retirement after EURO 2024 | जर्मनीचा दिग्गज फुटबॉलर थॉमस मुलरची निवृत्ती; EURO 2024 पराभवानंतर घेतला निर्णय

जर्मनीचा दिग्गज फुटबॉलर थॉमस मुलरची निवृत्ती; EURO 2024 पराभवानंतर घेतला निर्णय

Germany Thomas Muller announces international retirement: जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू आणि २०१४च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू थॉमस मुलर याने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करणारा मुलर हा टोनी क्रूसनंतरचा दुसरा जर्मन खेळाडू ठरला. म्युलरने ३४व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. नुकत्याच झालेल्या EURO 2024 मध्ये तो जर्मनीच्या संघाचा भाग होता. जर्मनीचा संघ उपांत्यपूर्व फेरीत स्पर्धेतून बाहेर पडला. युरो कप २०२४ च्या सुपर-८ फेरीत स्पेनने जर्मनीचा २-१ ने पराभव केला. स्पेनकडून डॅनी ओल्मो आणि मिकेल मेरिनो यांनी केलेल्या गोलमुळे यजमानांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर मुलरने निवृत्तीची घोषणा केली.

UEFA European Championship 2024 च्या समाप्तीनंतर मुलरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. "राष्ट्रीय संघाकडून १३१ सामने आणि ४५ गोल केल्यानंतर मी खेळाचा निरोप घेत आहे," असे मुलरने आपला निर्णय जाहीर करताना व्हिडिओमध्ये म्हटले. "माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मला नेहमीच अभिमान वाटतो आणि मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. एक चाहता म्हणून मी २०२६ च्या विश्वचषकात संघासाठी चिअर करेन. पण आता मैदानावर एक खेळाडू म्हणून मी दिसणार नाही," असे त्याने भावनिक होत सांगितले.

मुलरने मार्च २०१० मध्ये जर्मनीसाठी पदार्पण केले. त्या विश्वचषक स्पर्धेत त्याने पाच गोल केले होते आणि गोल्डन बूट, फिफा यंग प्लेयर हे मानाचे पुरस्कार जिंकले होते. ब्राझीलमध्ये झालेल्या २०१४च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करणाऱ्या जर्मनी संघातही त्याचा सहभाग होता. या स्पर्धेतही त्याने पाच गोल केले होते. मुलरने जर्मनीसाठी एकूण १९ विश्वचषक सामने खेळून १० गोल केले. आणि तीन गोल मध्ये असिस्ट केले.

Web Title: Germany star footballer Thomas Muller announces international retirement after EURO 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.