जर्मनीचा दुर्लक्षित खेळाडू ते ‘नॅशनल हीरो’

By admin | Published: July 15, 2014 02:28 AM2014-07-15T02:28:45+5:302014-07-15T02:28:45+5:30

मारियो गोत्झे! जर्मनीला २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटबॉल विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देणारा हीरो. ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू म्हणून मैदानात शिरलेला जगज्जेता

Germany's obscure player, 'National Hero' | जर्मनीचा दुर्लक्षित खेळाडू ते ‘नॅशनल हीरो’

जर्मनीचा दुर्लक्षित खेळाडू ते ‘नॅशनल हीरो’

Next

रियो दी जेनेरियो : मारियो गोत्झे! जर्मनीला २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटबॉल विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देणारा हीरो. ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू म्हणून मैदानात शिरलेला जगज्जेता. आता तो नॅशनल हीरो बनला आहे.
गोत्झेचा गेल्या वर्षभरातील प्रवास अत्यंत निराशादायी आणि वेदना देणारा होता. तो ज्या क्लबकडून खेळतो त्या बायर्न म्यूनिच संघातही वर्षभरात स्थान मिळवू शकला नव्हता. कुटुंबीय आणि प्रेयसीने मात्र त्याचा उत्साह टिकवून ठेवला आणि अखेर या उत्साहाला उधाण आले. २००९ साली त्याने १७व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमध्ये प्रवेश केला. पाच वर्षांत डॉर्टमन्ड आणि ब्रायर्न म्यूनिचसाठी १५० वर क्लब सामनेदेखील खेळले. गोत्झेने सोमवारच्या पहाटे अर्जेंटिनाविरुद्ध मारलेला विजयी गोल ३५ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ११वा गोल होता. मराकाना स्टेडियमवर काल आपल्या सहकाऱ्यांचा खेळ पाहत असताना त्याच्यातील युवा खेळाडू सारखा वळवळत होता. काहीतरी करून दाखविण्याची खुमखुमी होती. संधी मिळताच त्याचे टॅलेंट पुढे आले. जर्मनी विश्वविजेता बनला.
मेम्मिजेंन येथे जन्मलेला गोत्झे आठव्या वर्षी डॉर्टमन्ड अकादमीत सहभागी झाला. त्याचे वडील तंत्रविज्ञान विद्यापीठात प्रोफेसर होते. चिमुकला गोत्झे आपला मोठा भाऊ फॅबिन आणि थोरला भाऊ फेलिक्स यांच्यासोबत फुटबॉल खेळायचा. गोत्झे सांगतो, ‘या खेळात लहानपणापासूनच मी दोन्ही पायांनी चेंडूचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करायचो. त्याला २१ नोव्हेंबर २००९ला संघ व्यवस्थापक जुर्गेन क्लोप यांनी बदली खेळाडू म्हणून संधी दिली. त्याआधी १७ नोव्हेंबर रोजी त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवेश झाला होता. स्वीडनविरुद्ध मैत्री सामन्यात जोकिम लो याने बदली खेळाडू म्हणूनच मैदानात पाठविले होते. देशाकडून खेळणारा सर्वांत युवा खेळाडू म्हणूनही त्याला ओळखले जाऊ लागले. याशिवाय जर्मनीच्या सिनियर संघातील सर्वांत युवा खेळाडूचा मानही त्यानेच पटकावला. क्लोस थकल्यामुळे गोत्झेला ट्रॉफी खेचून आणण्याची संधी मिळाली.

Web Title: Germany's obscure player, 'National Hero'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.