राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर करा : क्रीडामंत्री

By Admin | Published: May 25, 2017 01:13 AM2017-05-25T01:13:09+5:302017-05-25T01:13:09+5:30

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे

Get organized for the national sports event soon: Sports Minister | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर करा : क्रीडामंत्री

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर करा : क्रीडामंत्री

googlenewsNext

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेला त्यांनी स्पर्धेचे आयोजन लवकरात लवकर करण्याची सूचना केली.
आयओए प्रमुख एन. रामचंद्रन यांना उद्देशून गोयल म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रत्येक दोन वर्षांनी व्हायला हवे. मागच्या वेळी चार वर्षांनंतर केरळमध्ये २०१५ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फार विलंबाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात या स्पर्धा होणार होत्या. पण, आयोजन झालेच नाही. याविषयी आयोजित बैठकीनंतर गोयल म्हणाले,‘माझी आज आयओए प्रमुखांसोबत दीर्घ चर्चा झाली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन वेळेवर व्हायला हवे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी मला लवकरच गोव्याचा दौरा करीत आयोजनाबाबत तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे.’ बैठकीला क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. आशियाड आणि आशियाई बीच क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. पुढील तीन आशियाई स्पर्धा स्थळे आधीच निश्चित झाली आहेत. भारताला २०२० च्या बीच आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची मात्र संधी असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Get organized for the national sports event soon: Sports Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.