स्वत:ला झोकून दबावाखाली खेळण्यास सज्ज व्हा!
By admin | Published: June 17, 2016 05:26 AM2016-06-17T05:26:07+5:302016-06-17T05:26:07+5:30
आॅलिम्पियन बनण्यासाठी त्या खेळाडूला सर्वप्रथम खेळाप्रती काही मूल्यांचे पालन करावे लागेल, त्याचप्रमाणे त्या खेळामध्ये स्वत:ला झोकून देत दबावाखाली खेळण्याची तयारी दाखवावी
मुंबई : आॅलिम्पियन बनण्यासाठी त्या खेळाडूला सर्वप्रथम खेळाप्रती काही मूल्यांचे पालन करावे लागेल, त्याचप्रमाणे त्या खेळामध्ये स्वत:ला झोकून देत दबावाखाली खेळण्याची तयारी दाखवावी लागेल, असे आॅस्टे्रलियाचा माजी दिग्गज जलतरणपटू इयान थॉर्प याने सांगितले. मुंबईत गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात थॉर्पची आघाडीच्या क्रीडा वाहिनीच्या आॅलिम्पिक पॅनलमध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
या वेळी थॉर्पसह माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण, नेमबाज अंजली भागवत, माजी हॉकीपटू वीरेन रस्किन्हा आणि जलतरणपटू रेहान पोंचा यांचीही उपस्थिती होती. त्याचप्रमाणे, आॅस्टे्रलियामध्ये क्रीडाक्षेत्रासाठी विशिष्ट वातावरण आहे. आमच्या देशात आॅलिम्पिकची शानदार परंपरा आहे, ज्याला मी पुढे नेले.
निशानेबाजांना आॅलिम्पिकमध्ये मानसिकरीत्या सक्षम बनावे लागेल. मानसिकरीत्या सज्ज झाल्यास त्यांना जगातील अव्वल खेळाडूंविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळेल. लंडन आॅलिम्पिकनंतर खेळाचे नियम बदल्याने निशानेबाजी अधिक आव्हानात्मक झाली आहे. एकाही भारतीय नेमबाजाला मागील चार वर्षांमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सध्या पदकांबाबत काही सांगता येणार नाही. - अंजली भागवत